शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

नदीकाठावर पुराचा धोका २० हजार क्युसेक्सलाच

By admin | Updated: June 10, 2015 05:37 IST

खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून २० हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यावरही नदीकाठावरील रहिवाशांसाठी धोकादायक ठरू शकते.

पुणे : खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून २० हजार क्युसेक्सने पाणी सोडल्यावरही नदीकाठावरील रहिवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. नदीपात्रात झालेली अतिक्रमणे आणि पडलेला राडारोडा यामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली असल्याची अप्रत्यक्ष कबुली महापालिकेतर्फेच देण्यात आली. पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष पावसाळा तोंडावर येऊनही सुरू झाला नव्हता. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त दिल्यावर, जागे झालेल्या प्रशासनाने मंगळवारी हा कक्ष सुरू केला. याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘मुठा नदीत वीस हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडल्या नंतर नदीकाठच्या परिसरात तत्काळ अतिदक्षतेचा इशारा जाहीर केला जाणार आहे. यापूर्वी चाळीस हजार क्युसेक्स पाणी सोडल्यानंतर, हा इशारा दिला जात होता. नदीकाठच्या परिसरात पाणी घुसून दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यामध्ये महापालिकेचा पूरनियंत्रण कक्ष २४ तास सुरू असणार आहे. १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही नियंत्रण कक्ष स्थापन केले आहे. अग्निशमन दल आणि क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी, अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांची टीम सज्ज ठेवण्यात येणार आहे. एसएमएसद्वारे मिळणार अलर्ट धरणांमधून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यानंतर, ज्या परिसरात पाणी घुसण्याची शक्यता आहे- त्या परिसरातील नागरिकांना तत्काळ ही माहिती मिळावी, यासाठी बल्क एसएमएसद्वारे अलर्ट देण्यात येणार आहे. हा अलर्ट संबंधित भागातील सोसायट्यांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक, क्षेत्रीय कार्यालयाचे कर्मचारी, तसेच त्या परिसरातील काही संस्थांनाही पाठविले जाणार आहेत. या शिवाय त्या परिसरातील संस्था, तसेच मंडळांनाही याबाबतचे अर्लट पाठविले जाणार आहेत.शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास अथवा नागरिकांना काही तक्रारी असल्यास, त्यांनी महापालिका क्षेत्रीय कार्यालय यांच्याशी संपर्क करावा. पूरनियंत्रण कक्षाचा २५५०६८००/१/२/३/४ हा क्रमांक चोवीस तास उपलब्ध असणार आहे. या शिवाय क्षेत्रीय कार्यालयांसाठीचे क्रमांकही लवकरच जाहीर केले जाणार असून, नागरिक १०१ या अग्निशमदलाच्या क्रमांकावरही संपर्क साधू शकतात.