शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पुण्यात लॉकडाऊनमध्ये फार्म हाऊसवर सुरू होता 'डान्सबार'; ९ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 21:14 IST

महापालिकेतील रिंगमास्टर ठेकेदारांसह ९ जणांना अटक

पुणे : राज्यात लॉकडाऊन असतानाही मुंबईहून डान्सर आणून उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फार्म हाऊसवर चक्क डान्स बार सुरु असल्याचे उघडकीस आले. कुडजे गावातील एका फार्म हाऊसवर मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकून महापालिकेतील रिंगमास्तर ठेकेदारांसह ९ जणांना अटक केली आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसायही सुरु असल्याचे निष्पन्न झाले असून ५ तरुणींची सुटका करण्यात आली आहे.

मंगेश राजेंद्र शहाणे (वय ३२, रा. संतनगर, अरण्येश्वर), ध्वनीत समीर राजपुत (वय २५),  निखील सुनिल पवार (वय ३३, रा.  पर्वती दर्शन), समीर उर्फ निकेश दिलीप पायगुडे (वय ३९, रा. आगळंबे फाटा, कुडे गाव, ता. हवेली), विवेकानंद विष्णु बडे (वय ४२, रा. नवी सांगवी), प्राजक्ता मुकुंद जाधव (वय २६, रा. मिलिंदनगर, सांताक्रुझ, मुंबई),  निलेश उत्तमराव बोधले (वय २९, दोघेही रा. पुरंदर हाऊसिंग सासोयटी, म्हाडा कॉलनी),  सुजित किरण आंबवले (वय ३४, रा. बालाजीनगर) आणि आदित्य संजय मदने (वय २४, रा. अंधेरी पुर्व, मुंबई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फार्म हाऊस व्यवस्थापक समीर पायगुडे, पार्टीचे आयोजन करणारा विवेकानंद बडे आणि डान्सर मुलींना घेऊन येणारी प्राजक्ता जाधव यांना न्यायालयाने ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर आरोपींची जामीनावर सुटका केली आहे.

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुडजे गावात लबडे फार्म हाऊसवर डी जेच्या तालावर तरुणींना नाचवत डान्सबार सुरु होता.  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिसांनी बुधवारी रात्री ११ वाजता तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे मुलीसह डान्स व मद्यप्राशन सुरु होते. त्याठिकाणी ९ जणांना अटक करण्यात आली. यावेळी पाच तरुणींची सुटका करण्यात आली असून तेथे वेश्याव्यवसायही सुरु असल्याचे पोलिसांना आढळून आले. 

अटक करणारे हे सर्व पुणे महापालिकेतील ठेकेदार असून काही जण भाजपचे पदाधिकारी असल्याचे समजते. दरम्यान, पळून गेलेला आरोपी संदीप चव्हाण (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) आणि लबडे फार्म हाऊसचे मालक यांच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

लॉकडाऊनमध्ये डान्सबारसुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये एक तरुणी ही पुण्यातील असून इतर ३ तरुणी मुंबई, कल्याण आणि ठाणे येथील आहेत. एक तरुणी मुळची सिलीगुडीची असून ती सध्या मुंबईत राहायला आहे. तिने इतर ४ तरुणींशी संपर्क साधून प्राजक्ता मार्फत या फार्महाऊसवर आल्या होत्या. न्यायालयाच्या परवानगीने त्यांची रवानगी रेस्क्यु फाऊंडेशनला करण्यात आली आहे. 

लॉकडाऊनमध्ये प्रवाससध्या लॉकडाऊन सुरु असून प्रवासासाठी ई पासची आवश्यकता आहे. असे असताना या तरुणी मुंबई, ठाणे, कल्याण येथून पुण्यात कशा आल्या. कोणी आणल्या. महापालिकेतील हे ठेकेदार रिंगमास्टर म्हणून ओळखले जातात. त्यांच्यातील एक जण महापालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयातील शाखा अभियंता असल्याचे सांगण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdanceनृत्यPoliceपोलिसraidधाडBJPभाजपा