शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारचा धिक्कार असो...! आंदोलनकर्ते आक्रमक; उदय सामंत, अजित पवारांचे फ्लेक्स फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 15:23 IST

मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांनी हुतात्म्य पत्करले आहे याचे सरकारला गांभीर्य नाही

पुणे: मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत, त्यांची अवस्था अंत्यंत नाजूक आहे. असे असताना एक उपमुख्यामंत्री आजाराचा बहाणा करून घरात बसून आहेत. तर दुसरे उपमुख्यमंत्री प्रचाराचे दौरे करत आहेत. आणि या सरकारचे मंत्री कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत. मराठा आरक्षणासाठी अनेक लोकांनी हुतात्म्य पत्करले आहे याचे सरकारला गांभीर्य नाही. त्यामुळे आम्ही या प्रकारचा कार्यक्रम होऊ देणार नाही. एक मराठा, लाख मराठा, मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणाऱ्या फडणवीसांचा धिक्कार असो... आरक्षणात अडथळा आणणाऱ्या भाजप सरकारचा धिक्कार असो... या प्रकारच्या घोषणा देत उदय सामंत याचे डीपी रोडवर लावण्यात आलेले फ्लेक्स फाडण्यात आले. 

आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी कार्यक्रमांतर्गत १ ते ५ नोव्हेंबर  या कालावधीत म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमाचे आयोजन वंचित विकास संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांचे हस्ते होणार होते. नेत्यांना आणि मंत्र्यांना गावबंदी असताना सामंत कार्यक्रम कसे करू शकतात? असा प्रश्न घेऊन काही आंदोलनकर्त्यांनी त्यांना विरोध करण्यासाठी तसेच त्यांचा निषेध करण्यासाठी जमले व कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला. 

उदय सामंत काही कारणामुळे या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे आलेल्या आंदोलनकर्त्यांकडून डीपी रोडवरील उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे फ्लेक्स फाडण्यात आले. फ्लेक्स पायदळी तुडवण्यात आले. यावेळी आरक्षण आमच्या हक्कच नाही कोनाच्या बापाचे..., कोण म्हणत देणार नाही, घेतल्या शिवय राहणार नाही... , जरांगे पाटील आगे बडो, हम  तुम्हारे साथ है... जय भवानी, जय शिवाजी... या घोषणाही देण्यात आल्या.

टॅग्स :PuneपुणेagitationआंदोलनUday Samantउदय सामंतAjit Pawarअजित पवारMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील