शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याची भर सभेत अजितदादांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 17:22 IST

अजित पवारांनी थांब तुला थोड्या वेळाने बोलतो, असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची राज्यातून जनसन्मान यात्रा सुरु आहे. कालपासून ही यात्रा पुण्यात दाखल झाली आहे. आज ती मावळात पोहोचल्यावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. य सभेत अजित पवारांचे भाषण सुरु असताना एका कार्यकर्त्याने त्यांना विनवणी केल्याचे समोर आले आहे. 'दादा, आपल्या राष्ट्रवादीत परत या ना', कार्यकर्त्याने भर सभेत अजितदादांकडे विनंती केली आहे. 

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभेला अजित पवारांना मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादीची फक्त एकच जागा निवडून आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आता गोंधळाचे वातावरण निर्मण झाले आहे. त्यांनी पक्ष फुटीनंतर अजितदादांना साथ दिली. आता मात्र ते पुन्हा शरद पवारांकडे जाण्याच्या वाटेवर आहेत. मध्यंतरी अजित दादांचे आमदार पुन्हा शरद पवारांकडे जाण्याच्या चर्चांना उधाण आले होते. तसेच रोहित पवारांनी अजित पवार गटातील कार्यकर्ते आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. परंतु त्यावेळी अजित पवारांनी असं काहीच नसल्याचे स्पष्ट केले. आणि या चर्चेला पूर्णविराम दिला. परंतु आज पुन्हा या कार्यकर्त्याच्या विनवणीने अनेक कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. 

शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी पुन्हा एकत्र यावं

अजित पवार यांचं भाषण सुरू असताना राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्याने ‘अजित दादा’ पुन्हा आपल्या पक्षात या, अशी मोठ्याने हाक मारली. तो कार्यकर्ता अजित दादा, अजित दादा असे तळमळीने ओरडत होता. त्यावेळी अजित पवारांनी थांब तुला थोड्या वेळाने बोलतो, असं म्हणत त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. तरुण थांबत नसल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या तरुणाच्या हातातील अजित दादा राष्ट्रवादीत पक्षात पुन्हा या असा उल्लेख असलेलं फ्लेक्स काढून घेतला. विक्रम बोडके असं या तरुणाचं नाव आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा या तरुणाने व्यक्त केली आहे.  

टॅग्स :PuneपुणेmavalमावळNCPराष्ट्रवादी काँग्रेसMLAआमदारAjit Pawarअजित पवारvidhan sabhaविधानसभा