हडपसरमध्ये कारचालकाची ‘दादा’गिरी, PMPML चालकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2023 10:57 IST2023-08-26T10:56:05+5:302023-08-26T10:57:14+5:30

पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला...

'Dada' behavior of car driver in Hadapsar, beating of PMPML driver pune crime | हडपसरमध्ये कारचालकाची ‘दादा’गिरी, PMPML चालकाला मारहाण

हडपसरमध्ये कारचालकाची ‘दादा’गिरी, PMPML चालकाला मारहाण

पुणे : एका कार चालकाने पीएमपी चालकाला मारहाण केल्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध पोलिसांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

अमोल लोंढे (२०, रा. संकेत विहार, हडपसर) असे मारहाण करणाऱ्या कार चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी चालक तुषार डोंबाळे (३५, रा. सोरटेवाडी) यांनी हडपसर पाेलिस ठाण्यात लोंढे विरोधात तक्रार दिली. हडपसर भागातील संकेत विहार सोसायटीसमोर कारचालक लोंढेने अचानक कार बससमोर थांबवली. बस मागे घे, असे सांगत लोंढेने पीएमपी चालक डोंबाळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लोंढे पीएमपी बसमध्ये शिरला. त्याने डोंबाळे यांना थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. याप्रकरणाचा पुढील तपास याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सुशील डमरे करत आहेत.

Web Title: 'Dada' behavior of car driver in Hadapsar, beating of PMPML driver pune crime