शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 10:26 IST2024-12-13T10:26:41+5:302024-12-13T10:26:59+5:30
गाडीवर लायटरमध्ये गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला त्यामध्ये ३ जण जखमी झाले

शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तिघे जखमी
पुणे : शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीनच्या समोरील खाद्यपदार्थांच्या हातगाडीवर लायटर गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला. यात तिघे किरकोळ भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी (दि. १२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
कामगार गोविंदा अंकुशे (वय ४२) , संतोष सोनवणे (वय ३७) आणि पोलिस नाईक नीलेश सुभाष दरेकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर औंध येथील एम्स हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती ठीक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२) शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीनच्या समोरील वडापावची गाडी आहे . दुपारी अडीचच्या सुमारास चहा पिण्यासाठी एका हातगाडी जवळ पोलिस नाईक गेले होते. त्यावेळी अचानक गाडीवर लायटरमध्ये गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला यामध्ये दरेकर यांचे दोन्ही हात आणि चेहऱ्याला भाजले आहे. कामगारदेखील जखमी झाले आहेत. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.