चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी तामिळनाडूला धडकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 21:13 IST2018-11-14T21:09:24+5:302018-11-14T21:13:49+5:30
पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गाजा चक्रीवादळ आता भारतीय किनारपट्टीजवळ आले असून ते गुरुवारी सायंकाळी तामिळनाडू, श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे़.

चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी तामिळनाडूला धडकणार
पुणे : पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गाजा चक्रीवादळ आता भारतीय किनारपट्टीजवळ आले असून ते गुरुवारी सायंकाळी तामिळनाडू, श्रीलंकेच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे़. यामुळे तामिळनाडू व पॉडेचरीच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून त्यादृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत़.
पश्चिम बंगालच्या उपसागरातील हे चक्रीवादळ बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता चेन्नईपासून ४९० किमी तर नागापट्टीनामपासून ५८० किमी दूर होते़. सध्या या चक्रीवादळामुळे ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहत असून त्याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे़. मात्र, किनारपट्टीवर येत असतानाच वाºयाचा वेग गुरुवारी सायंकाळपर्यंत ५० ते ६० किमीपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे़.
या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अंतर्गत भागात ताशी ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे़. तामिळनाडू व पाँडेचरीतील काही ठिकाणी २०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे़.