शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

गर्दी, वाहनांनी वाढविले ध्वनिप्रदूषण; गोंगाट ८० डेसिबलच्या पुढे: अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी केली पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 02:30 IST

गणेशोत्सवात ढोल-ताशांचा निनाद तसेच डीजेच्या दणदणाटाने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. पण याशिवाय देखावे पाहण्यासाठी वाढलेली गर्दी, वाहनांची संख्या, तसेच काही मंडळांच्या देखाव्यांमध्ये सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकांचीही ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे.

पुणे : गणेशोत्सवात ढोल-ताशांचा निनाद तसेच डीजेच्या दणदणाटाने मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होत असते. पण याशिवाय देखावे पाहण्यासाठी वाढलेली गर्दी, वाहनांची संख्या, तसेच काही मंडळांच्या देखाव्यांमध्ये सुरू असलेल्या ध्वनिक्षेपकांचीही ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. हा गोंगाट ८० डेसिबलच्या पुढे गेल्याचे पाहणीत आढळून आले आहे.शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून गणेशोत्सवापूर्वी, गणेशोत्सवादरम्यान आणि विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण मोजण्याचे काम केले जाते. यंदाही विद्यार्थ्यांकडून ध्वनिप्रदूषणाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या सरावाच्या वेळी आवाजाच्या नोंदी घेतल्या होत्या. यामध्ये ध्वनिप्रदूषणाची पातळी ७० ते ७५ पर्यंत नोंदविली गेली होती. काही ठिकाणी ही पातळी ८० डेसिबलपर्यंत गेली होती. मात्र, गणेशोत्सवादरम्यान रात्रीच्या वेळी घेतलेल्या नोंदींमध्ये ही पातळी काही ठिकाणी ८८ डेसिबलपर्यंतही गेल्याचे समोर आले आहे.नीलेश वाणी व प्रवीण शिवपुजे या विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्री ९ नंतर टिळक रस्त्यावर विविध ठिकाणी आवाजाच्या नोंदी घेतल्या आहेत. टिळक चौकामध्ये घेतलेल्या नोंदीमध्ये ध्वनिप्रदूषणाची सरासरी पातळी ८०.२९ डेसिबलएवढी नोंदविली गेली आहे, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या परिसरात सर्वाधिक ८८.१३ डेसिबलपर्यंत हा गोंगाट असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले.शनिवारी देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची संख्याही वाढली होती. त्यामुळे रस्त्यावर गोंगाट वाढला. काही ठिकाणीमंडळांच्या ध्वनिक्षेपकामुळे यात भर पडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. ध्वनिप्रदूषणाची सुरक्षित पातळी ५५ ते ६५ डेसिबल अशी धरली जाते. रात्रीच्या वेळी ही पातळी ५५ असते. पण त्यापेक्षा ३० ते ३५ डेसिबलने अधिक ध्वनिप्रदूषण नोंदविले गेले आहे, असे महाविद्यालयातील महेश शिंदीकर यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणे