शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

"दारुसाठी काय पण"म्हणत वाईन शॉप समोर तोबा गर्दी; तळीरामांना जागेवर आणण्यासाठी पोलिसांचा लाठीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2020 17:55 IST

कोरोना असला म्हणून काय झाले दारुसाठी वाटेल ते...

ठळक मुद्देअनेकांनी रात्रीपासूनच दारुच्या दुकानासमोर नंबर लावण्यास केली सुरुवात दुकानाच्या बाहेर गर्दी केल्याने त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माणकोरोना संक्रमणशील भागात जीवनावश्यक वस्तुखेरीज इतर सर्व दुकाने बंद

पुणे :  एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासन यांची धडपड सुरु आहे. दुसरीकडे दीड महिन्यापासून घरात बसलेल्या तळीरामांना काही करुन आपला थरथराट कमी करण्यासाठी दारु हवी आहे. अशावेळी प्रशासनाने दारुची दुकाने उघडणार असल्याचे जाहीर केले आणि तळीरामांच्या आनंदाला उधाण आले. अनेकांनी तर रात्रीपासूनच आपआपल्या भागातील दारुच्या दुकानाबाहेर मुक्काम ठोकला. सोमवारी शहरातील दारुच्या दुकानाबाहेर लागलेल्या लांबच्या लांब रांगामुळे कोरोना नव्हे तर ''दारुसाठी वाटेल ते '' करण्याची तयारी अनेकांनी दाखवली. या सगळयात मात्र ''फिजिकल डिस्टन्स''चा फज्जा उडाल्याने पोलिसांना तळीरामांना जागेवर आणण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला.  गेल्या काही दिवसांपासून दारुची दुकाने सुरु करावीत अशी मागणी विविध स्तरांतून होत असताना त्याला जोरदार पाठींबा तळीरामांकडून मिळत आहे. अशातच रविवारी दारुची दुकाने सोमवारपासून खुली होतील. याला अपवाद फक्त कोरोना संक्रमणशील भागाचा असेल असे पालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात नमुद करण्यात आले होते. त्यात दुकानांची वेळ निश्चित करण्यात आली होती. सोशल मीडियावरुन दारुची दुकाने सुरु होणार अशा प्रकारचा मेसेज व्हायरल झाल्याने अनेकांनी रात्रीपासूनच दारुच्या दुकानासमोर नंबर लावण्यास सुरुवात केली होती. सोमवारी देखील सकाळी सहा - सात वाजल्यापासून शहरातील दारुच्या दुकानाबाहेर तळीरामांच्या रांगा लागल्याचे दिसून आले.

कोरोना संक्रमणशील भागात जीवनावश्यक वस्तुखेरीज इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांचा बंदोबस्त असणारी सतत सुरु असणारी गस्त यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र याच्या उलट चित्र शहरातील डेक्कन, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन रस्ता, कर्वे रस्ता आणि ताडीवाला रस्त्यांवर असणा-या दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांची लांबवर रांग लागली होती. विशेष म्हणजे फिजिकल डिस्टन्स न ठेवता दुकानाच्या बाहेर गर्दी केल्याने त्याठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती निर्माण झाली होती.  रांगेत असणा-या लोकांनी बेशिस्तपणे वागण्यास सुरुवात केल्यानंतर पोलिसांना नाईलाजाने बळाचा वापर करावा लागला. अनेकजण रांग मोडून दारु घेण्यासाठी धडपडत होते. यावेळी रांगेतील नागरिकांबरोबर हुज्जत, भांडण्याचा प्रसंग काहींवर ओढावला होता. काही करुन दारु हवी यासाठी तळीराम एकापेक्षा एक कल्पना लढवत होते. आपला नंबर लवकर यावा यासाठी अफवा पसरवणे, पोलीस आले आहेत असे खोटे सांगणे, स्टॉक संपल्याचे सांगणे, व्हाटसअपवरील खोटे सरकारी आदेश दाखवत होते. 

* पोलिसांचा मार खाऊन देखील पुन्हा रांगेत उभे डेक्कन, फर्ग्युसन्न रस्त्यावर दुपारच्या वेळी सुरु असणाऱ्या दारुच्या दुकानाबाहेर प्रचंड गर्दी जमली होती. अशावेळी कुठलेही नियम न पाळता, शिस्तीचे पालन न करता तळीराम दारुसाठी भर उन्हात रांगेत उभे होते. याप्रसंगी रांग मोडून मध्येच घुसणाऱ्यांमुळे भांडणाची स्थिती निर्माण होत होती. अखेर पोलिसांनी त्या भागातील दारुचे दुकान बंद करुन लोकांना घरी जाण्यास सांगितले. पोलीस थोड्यावेळाने जातील आणि दारु मिळेल या आशेवर कित्येकजण पुन्हा रांगेत उभे राहिले. तळीराम ऐकत नाहीत म्हटल्यावर नाईलजाने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. यात पोलिसांचा मार खाऊन देखील तळीराम रांगेत उभे राहत असल्याने पोलिसांनी आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :Puneपुणेliquor banदारूबंदीPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस