'तुझ्यामुळे मी ३ महिने जेलमध्ये गेलो... आता तुझी विकेट काढतो'; गुन्हेगाराचा तरुणावर कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 09:41 IST2022-02-18T09:32:19+5:302022-02-18T09:41:03+5:30

खडकी पोलिसांनी त्याच्यावर दुसऱ्यांदा खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे

criminal attacked the young man with a scythe and tried to kill him pune city crime | 'तुझ्यामुळे मी ३ महिने जेलमध्ये गेलो... आता तुझी विकेट काढतो'; गुन्हेगाराचा तरुणावर कोयत्याने वार

'तुझ्यामुळे मी ३ महिने जेलमध्ये गेलो... आता तुझी विकेट काढतो'; गुन्हेगाराचा तरुणावर कोयत्याने वार

पुणे : ‘‘तुझ्यामुळे मी ३ महिने जेलमध्ये गेलो, तू माझ्यावर ३०७ केली होती. आता तुझी मस्ती काढतो. आज तुझी विकेट टाकतो,’’ असे म्हणून एका सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी त्याच्यावर दुसऱ्यांदा खुनाचा प्रयत्न (कलम ३०७) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

रोहित गद्रे (रा. दापोडी) व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिषेक तुकाराम मोरे (वय ३०, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना बोपोडीतील शिवाजी गार्डन येथील गंगाम्मा चायनीजजवळ सोमवारी रात्री ११ वाजता घडली.

फिर्यादी व त्यांचा मित्र निखिल गायकवाड हे शिवाजी गार्डन येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा रोहीत गद्रे हा त्याच्या दोन साथीदारांसह तेथे आला. कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. फिर्यादीने डावा हात मध्ये घातल्यामुळे कोयत्याने डाव्या हाताला जखम झाली. इतर आरोपींनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. कोयते हवेत फिरवून मोठ मोठ्याने ओरडून दहशत निर्माण केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भाबड तपास करीत आहेत.

Web Title: criminal attacked the young man with a scythe and tried to kill him pune city crime