सराईत गुंडाच्या अंत्यविधीला बाईक रॅली काढून दहशत पसरविणाऱ्याला बेड्या, दोन महिन्यांपासून होता फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:57 PM2021-06-22T22:57:39+5:302021-06-22T23:04:54+5:30

आरोपी हा खेड शिवापूर येथील दर्गाजवळ मित्राला भेटण्यासाठी येणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

Criminal arrested for spreading terror by removing rally of criminal funeral | सराईत गुंडाच्या अंत्यविधीला बाईक रॅली काढून दहशत पसरविणाऱ्याला बेड्या, दोन महिन्यांपासून होता फरार

सराईत गुंडाच्या अंत्यविधीला बाईक रॅली काढून दहशत पसरविणाऱ्याला बेड्या, दोन महिन्यांपासून होता फरार

Next

पुणे : गुंड माधव वाघाटे याचा खून झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला  रॅली काढत दहशत पसविणार्‍या व गेली २ महिने फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने अटक केली आहे. 

सिद्धार्थ संजय पलंगे (वय २१, रा. गुलमोहर सोसायटी, बालाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पलंगे याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत, मारामारी असे ३ गुन्हे सहकारनगर, दत्तवाडी, बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल आहेत. माधव वाघाटे याचा खुन झाल्यानंतर त्यांची अंत्यविधीची रॅली काढण्यामध्ये सिद्धार्थ पलंगे हा इतरांबरोबरच प्रमुख होता. रॅलीनंतर तो गेल्या २ महिन्यांपासून फरार होता. पोलीस अंमलदार अमोल पवार यांना माहिती मिळाली की, सिद्धार्थ पलंगे हा खेड शिवापूर येथील दर्गाजवळ मित्राला भेटण्यासाठी येणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने खेड शिवापूर दर्ग्याजवळून त्याला ताब्यात घेतले.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनिल कुलकर्णी व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कामगिरी केली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Criminal arrested for spreading terror by removing rally of criminal funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app