अकरावीची परीक्षा घेतल्याप्रकरणी तळेगावला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 06:09 IST2020-06-13T06:09:36+5:302020-06-13T06:09:54+5:30

अकरावी कॉमर्सच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आयटी विषयाचा पेपर होता. २७ विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. प्रशासन आणि पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

Crime in Talegaon for taking 11th exam | अकरावीची परीक्षा घेतल्याप्रकरणी तळेगावला गुन्हा

अकरावीची परीक्षा घेतल्याप्रकरणी तळेगावला गुन्हा

तळेगाव दाभाडे (पुणे) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि राज्यात शैक्षणिक परीक्षा घेण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तळेगाव येथील स्नेहवर्धक मंडळ शैक्षणिक ट्रस्ट संचलित, महाविद्यालयात नियमांचे उल्लंघन करून परीक्षा सुरू होती. संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकरावी कॉमर्सच्या अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आयटी विषयाचा पेपर होता. २७ विद्यार्थी परीक्षेत सहभागी
झाले होते. प्रशासन आणि पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली.

Web Title: Crime in Talegaon for taking 11th exam