शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

घरफोडी व वाहन चोरी प्रकरणातील दोन आरोपीस गुन्हे पथकाकडून अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:23 IST

कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर येथे चोरी केल्याचे कबूल केले

लोणी काळभोर : लोणी काळभोर व हडपसर परिसरात घरफोडी व वाहन चोरीच्या गुन्हयातील दोन सराईत गुन्हेगारांना देशी कट्ट्यासह गुन्हे शाखा पथक ६ ने अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे शहर गुन्हे पथकाच्या युनिट ६ मधील पोलिस हवालदार नितीन मुंडे यांना बातमीदाराकडून सय्यदनगर येथे एक इसम देशी बनावटीचे शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पोलीस पथक त्याठिकाणी गेले असता तेथे समीर उर्फ कमांडो हनीफ शेख, (वय १९ वर्षे, रा. गल्ली नं.२३, सय्यदनगर, हडपसर, पुणे)आढळून आला. त्याच्याकडे एक देशी बनावटीचे अग्निशस्त्र, २ जिवंत काडतुसे, घरफोडीचे साहित्य आणि चोरी केलेल्या दोन मोटर सायकल हस्तगत केल्या.आरोपीकडे अधिकची चौकशी केली असता त्याने कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी केल्याचे तसेच लोणी काळभोर व हडपसर येथे चोरी केल्याचे कबूल केले. शेख यास अग्निशस्त्र व काडतुसे पुरवणारा सराईत यश मुकेश शेलार, (वय २० वर्षे, रा. तरडे वस्ती, महंमदवाडी, पुणे) यास अटक करण्यात आली असुन त्याचेकडुन एक देशी कट्टा हस्तगत करण्यात आला.असा एकूण १२ लाख १७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.ही कामगिरी गुन्हे अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, पोलीस उपआयुक्त विवेक मासाळ,सहाय्यक पोलीस आयुक्त गजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलिस हवालदार बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, सुहास तांबेकर, प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक