मुलीच्या बदनामीप्रकरणी ‘जब्या’विरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 21:42 IST2018-09-15T21:41:18+5:302018-09-15T21:42:05+5:30
हा ‘जब्या’ नागराज मंजुळेंच्या ‘फॅन्ड्री’तला नसून बारामतीतला आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपवर पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या फोटोवर अश्लील कमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे.

मुलीच्या बदनामीप्रकरणी ‘जब्या’विरुद्ध गुन्हा
वडगाव निंबाळकर : अल्पवयीन मुलीबद्दल अश्लील ‘कमेंट’ केल्याबद्दल ‘जब्या’विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा ‘जब्या’ नागराज मंजुळेंच्या ‘फॅन्ड्री’तला नसून बारामतीतला आहे. व्हॉट्स अॅप ग्रुपवर पडलेल्या अल्पवयीन मुलीच्या फोटोवर अश्लील कमेंट करणे चांगलेच महागात पडले आहे.
जब्या ऊर्फ रोहित सूर्यकांत जगताप (वय २०, रा. बाबुर्डी, ता. बारामती), ऋषीकेश आनंदराव चांदगुडे (वय २०, रा. काºहाटी) अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चांदगुडे याने एचबीडी स्वप्निल भाऊ या व्हॉट्स अॅप ग्रुपवर सोमवारी (दि. १०) पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो टाकला होता.
त्या ग्रुपमधील सदस्य असणारा जब्या याने फोटोवर अश्लील कमेंट केली होती. या प्रकाराची माहिती मुलीला समजताच तिने पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली. पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये, विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही तरुणांना ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.