शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात गुन्हेगारी

By admin | Updated: September 5, 2015 03:21 IST

राजकीय व्यक्ती, नगरसेवकांवरील खुनी हल्ल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढत चालल्या आहेत. खुनी हल्ल्यात आत्तापर्यंत चार नगरसेवकांचा बळी गेला.

संजय माने , पिंपरीराजकीय व्यक्ती, नगरसेवकांवरील खुनी हल्ल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वाढत चालल्या आहेत. खुनी हल्ल्यात आत्तापर्यंत चार नगरसेवकांचा बळी गेला. त्यामुळे संतांची नगरी असलेल्या शहराच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ लागले आहे. पिंपरी-चिंचवड औद्यागिक क्षेत्रात कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य असल्याने हे शहर कामगारनगरी म्हणून नावारूपाला आले. श्रीक्षेत्र आळंदी, देहू आणि गणेश भक्त मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली संतभूमी सुरुवातीला शांत होती; परंतु पैशासाठी राजकारण, राजकारणातून पैसा यासाठी वाट्टेल ते करण्यापर्यंतची मजल गाठली. गेल्या काही वर्षात शहरातील राजकारणात गुन्हेगारीचा शिरकाव झाला आहे. त्याचा प्रत्यय पदोपदी येऊ लागला आहे. शहरातील गुन्हेगारी टोळ्यांतील गुंड पुण्यातील अथवा बाहेरील कोणत्या ना कोणत्या टोळीशी संलग्न आहेत. स्थानिक पातळीवरही काही टोळ्या सक्रिय आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नगरसेवकांवर हल्ले होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अद्यापही घडत आहेत. गुन्हेगारी कारवायांशी सुतराम संबंध नसलेल्या भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्यासारख्याचाही हल्ल्यात नाहक बळी गेला आहे. अशिक्षित नगरसेवकही विविध मार्गांनी अधिकाधिक पैसे कमाविण्याचा प्रयत्न करतात. कोणी ठेकेदारीत भागीदारी, तर कोणी अवैध धंद्यात सहभाग देतात. त्यांचा कोणाशी संबंध येतो, ते कोणत्या प्रकारचे काम करतात, याबद्दल सर्वसामान्य अनभिज्ञ असतात. अधिक पैसे मिळविण्यासाठी ते जे काही करतात, त्याचे पडसाद वेळोवेळी उमटत असतात. कधी हल्ल्याच्या स्वरूपात, तर कधी वेगळ्या स्वरूपात त्यांचे नाव चर्चेत येते. त्या वेळी खरे स्वरूप उघड होते. आपल्या निकटवर्तीयांना महापालिकेतील कामाचा ठेका मिळवून देण्यासाठी स्पर्धेतील अन्य ठेकेदारांना दमदाटी करणारे, त्यांच्या अंगावर धावून जाणारे नगरसेवकही महापालिकेत आहेत.