"पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा", महिलेकडे पाहून गाणं म्हणणाऱ्या ६० वर्षाच्या आजोबांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 14:08 IST2022-08-24T14:08:10+5:302022-08-24T14:08:42+5:30

आरोपीविरोधात गुन्हा दाखल...

Crime on 60-year-old grandfather who sings while looking at female in pune | "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा", महिलेकडे पाहून गाणं म्हणणाऱ्या ६० वर्षाच्या आजोबांवर गुन्हा

"पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा", महिलेकडे पाहून गाणं म्हणणाऱ्या ६० वर्षाच्या आजोबांवर गुन्हा

पुणे: पुण्यात काहीही घडू शकतं. असंच एक खळबळजनक अन् लज्जास्पद कृत्य एका ६० वर्षीय जेष्ठ नागरिकाने केलंय. झालं असं की, या आजोबांनी एका महिलेकडं पाहत चक्क गाणं म्हटलंय. त्या आजोबांनी महिलकडे बघत, 'पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा...' हे गाणं गायलं. त्यामुळे या वृद्ध इसमावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अशोक भरतू चुणचुने असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक हा येरवड्यात असलेल्या जामा मशीदीजवळ पीडित महिलेच्या घरी भाड्याने राहायला आहे. रात्रीच्या सुमारास तो महिलेकडे बघून पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा हो.. हे गाणं म्हणत महिलेला छेडले.

अधिक माहितीनुसार, चुणचुने यांनी मद्यधुंद अवस्थेत अनेक वेळा या महिलेची छेड काढली आहे. या त्रासाला कंटाळून महिलेने पोलिस स्टेशन मध्ये धाव घेतली. आरोपी अशोक चुनचुने याच्यावर (३५४) येरवडा पोलीस स्थानकात विविध कलमान्वे गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Crime on 60-year-old grandfather who sings while looking at female in pune