धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर ५२ वर्षांच्या शिक्षकाकडून बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 15:00 IST2021-11-01T14:39:42+5:302021-11-01T15:00:27+5:30
पुणे : एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कारकरून अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ...

धक्कादायक! पुण्यात अल्पवयीन मुलीवर ५२ वर्षांच्या शिक्षकाकडून बलात्कार
पुणे : एका शिक्षकाने अल्पवयीन मुलीला टेरेसवर नेऊन तिच्यावर बलात्कारकरून अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या ५२ वर्षांच्या शिक्षकाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. संजय रमेश शर्मा (वय ५२, रा. जगताप नगर, वानवडी), असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
याप्रकरणी १५ वर्षांच्या मुलीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार ३ ऑगस्ट आणि २९ ऑक्टोबरदरम्यान आरोपीच्या राहत्या घराच्या टेरेसवर घडला. पीडित मुलीला धमकावून त्याने हे कृत्य केले. पीडित मुलीने तिच्या आईला आरोपीने केलेल्या घाणेरड्या कृत्याबद्दल सांगितल्यानंतर वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी
सांगितले.