पुणे - नाशिक परिसरात चर्चेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर झालेल्या ‘सेटलमेंट’च्या आरोपांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रुपाली पाटील ठोंबरे यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप केला होता. मात्र, या सर्व आरोपांना देसाईंनी ठामपणे फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.लोकमतशी संवाद साधताना देसाईंनी सांगितले की, कॅप्टन अशोक खरात यांच्याविरोधातील महत्त्वाचे पुरावे (पेनड्राईव्ह) काही माध्यमांतून त्यांच्या पर्यंत पोहोचले होते. या पुराव्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांचे कथित व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला. देसाईंनी स्पष्ट केले की, हे प्रकरण थेट माध्यमांसमोर आणण्याऐवजी त्यांनी आरोपी पळून जाऊ नये म्हणून थेट पोलिसांकडे पुरावे सुपूर्द केले. जर मी पत्रकार परिषद घेतली असती, तर आरोपी देशाबाहेर पळून गेला असता. त्यामुळे मी थेट वरिष्ठ यंत्रणांकडे पुरावे दिले, असेही त्या म्हणाल्या.
Web Summary : Trupti Desai denies settlement allegations in the Captain Kharat case, stating she provided crucial evidence to police, leading to his arrest for alleged atrocities against women. She refuted financial dealings claims.
Web Summary : तृप्ति देसाई ने कैप्टन खरात मामले में सेटलमेंट के आरोपों का खंडन किया। उन्होंने कहा कि उन्होंने पुलिस को अहम सबूत दिए जिससे महिलाओं पर अत्याचार के आरोप में खरात की गिरफ्तारी हुई। उन्होंने वित्तीय लेनदेन के दावों को गलत बताया।