पुणे : खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या खून प्रकरणातील पसार आरोपीला वानवडी पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील हांडेवाडी भागात ही कारवाई करण्यात आली. आरोपी आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांनी काळोखे यांची सुपारी घेऊन खून केल्याची कबुली दिली.
खालीद खलील कुरेशी (२३, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा खून करण्यात आला होता. हडपसरमधील रामटेकडी औद्योगिक वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन त्यांच्याकडील सोन्याची चैन हिसकावण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. याप्रकरणात उमर नूर खान, साहिल हबीब फकीर यांना अटक करण्यात आली होती. दोघांची चौकशी करण्यात आली. तेव्हा आरोपी खालीद कुरेशी हा गुन्हा करुन पसार झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी खालीद कुरेशीचा शोध सुरू केला.
तपासात खालिद हडपसरमधील हांडेवाडी भागात येणार असल्याची माहिती वानवडी पोलिस ठाण्याच्या तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत खालीद याने खोपोलीतील माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांचा दोन मित्रांशी संगनमत करुन खून केल्याची कबुली दिली. काळोखे यांचा खून करण्यासाठी त्यांना एकाने सुपारी दिल्याची माहिती दिली. अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Web Summary : Police arrested an accused in the Khopoli ex-councilor Mangesh Kalokhe murder case from Pune. He confessed to a contract killing with two accomplices. The arrest occurred in Hadapsar. Investigation revealed a connection to a senior citizen robbery.
Web Summary : पुणे में पुलिस ने खोपोली के पूर्व पार्षद मंगेश कालोखे हत्याकांड के एक आरोपी को गिरफ्तार किया। उसने दो साथियों के साथ सुपारी लेकर हत्या करने की बात कबूल की। गिरफ्तारी हडपसर में हुई। जांच में एक वरिष्ठ नागरिक की लूट से संबंध का पता चला।