पुणे : विमाननगर येथील ॲटलान्टिस रुफ टॉप लाऊंज हॉटेलमध्ये अवैधरीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी दोनच्या पथकाने छापा टाकला. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात हुक्का विक्री सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी, पोलिसांनी हॉटेल मालकासह मॅनेजर आणि वेटर अशा सात जणांना पकडले असून, त्यांच्या विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी हॉटेलमधून हुक्का पॉट, विदेशी दारूच्या बाटल्या, व इतर साहित्य असा १ लाख ४७ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्वप्नील शांताराम तांबे (वय ३२), अमेय मुकेश अजमीरे (वय २८, दोघे रा. वाघोली), नवरंग विठ्ठलराव कोल्हे (वय २८, रा. विमाननगर), अमितकुमार दयालजी गोयल (वय २६), कमरूल इस्लाम लष्कर (वय २६), शिवमकुमार श्रीरामराज यादव (वय २३), माहरूफ अफताफउद्दीन आलम (वय १८, सर्व रा. खराडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
कोम्बिंग ऑपरेशनच्या पार्श्वभूमीवर अमली पदार्थ विरोधी पथक दोन गस्तीवर होते. त्यावेळी ॲटलान्टिस या हॉटेलमध्ये अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलिस निरीक्षक नितीन नाईक, कर्मचारी शेख, पृथ्वीराज पांडुळे, संदीप देवकाते, दिनेश बास्टेवाड, सतीश चव्हाण, प्रशांत कळसकर आणि वैशाली माकडी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
Web Summary : Pune police raided a hookah parlor in Viman Nagar, arresting seven, including the hotel owner. A large quantity of hookah and liquor, worth ₹1.47 lakh, was seized during the raid. The operation was conducted based on a tip-off regarding illegal activities.
Web Summary : पुणे पुलिस ने विमान नगर में एक हुक्का पार्लर पर छापा मारा, होटल मालिक सहित सात गिरफ्तार। छापे के दौरान ₹1.47 लाख मूल्य के हुक्का और शराब की बड़ी मात्रा जब्त की गई। यह कार्रवाई अवैध गतिविधियों की सूचना पर की गई।