दौंड नगरपरिषदेतील दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 12:33 IST2025-11-08T12:32:11+5:302025-11-08T12:33:01+5:30
दौंड : दौंड नगरपरिषदेतील दोन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने लाचखोरीचा गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नगरपरिषदेतील रोखपाल ओंकार मेनसे, ...

दौंड नगरपरिषदेतील दोन अधिकाऱ्यांच्या विरोधात लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा
दौंड : दौंड नगरपरिषदेतील दोन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत विभागाने लाचखोरीचा गुन्हा नोंदविला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. नगरपरिषदेतील रोखपाल ओंकार मेनसे, लेखापाल भाग्यश्री येळवे यांच्यावर ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शुक्रवार (दि.७) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी ओंकार मेनसे याला ताब्यात घेण्यात आले आहे.
नगरपालिकेतील सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदाराला मुदतवाढ तसेच केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी वरील दोघांनी ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने ६ मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंध खात्याकडे तक्रार केली होती. एकंदरीतच या तक्रारीची पडताळणी केली असता वरील दोघांनी ७० हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी विजय कावळे यांच्या कार्यकाळातील ही दुसरी घटना आहे.