Corona Vaccination In Pune: शहरात शुक्रवारी १८८ केंद्रांवर कोविशिल्ड तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 22:07 IST2021-09-30T22:06:54+5:302021-09-30T22:07:01+5:30
लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार

Corona Vaccination In Pune: शहरात शुक्रवारी १८८ केंद्रांवर कोविशिल्ड तर ११ ठिकाणी कोव्हॅक्सिन
पुणे : पुणे महापालिकेच्या १८६ केंद्रांवर शुक्रवारी १ ऑक्टोबरला प्रत्येकी १०० कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर ससूनसह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये प्रत्येकी १०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना १० टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर १० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना (८ जुलैपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तर कोव्हॅक्सिन लसीचा ३ सप्टेंबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.