शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाज अडीच तासांच्या एकाच शिफ्टमध्ये चालणार; मुंबई उच्च न्यायालयाची नवीन नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 21:35 IST

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वेळेत बदल.....

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे न्यायालयीन कामकाजाच्या वेळा आणखी कमी करण्यात आल्या असून, आता. दोन शिफ्टऐवजी एकाच शिफ्टमध्ये अडीच तासच कामकाज चालणार आहे. याचा परिमाण खटल्यांच्या सुनावणी व पक्षकारांवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील न्यायालयीन कामकाजाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार सोमवारपासून (दि१९) येथील जिल्हा न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी 1.30 अशा एक शिफ्टमध्ये अडीच तास सुरू राहणार आहे. तसेच या काळात ५० टक्केच कर्मचारी उपस्थित असणार आहेत.मात्र, सर्व न्यायाधीशांनी उपस्थित राहावे, असे उच्च न्यायालयाच्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

सध्या न्यायालयातील कामकाज सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी १.३० ते ३.३० अशा दोन शिफ्टमध्ये सुरू होते. त्यात जोडून आलेल्या सुट्या व उच्च न्यायालयाने दिलेल्या अतिरिक्त सुट्यांमुळे सोमवार ते शनिवारपर्यंत (दि.१२ ते १८) कामकाज बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारपासून न्यायालये सुरू झाल्यानंतर एकच शिफ्टमध्ये कामकाज चालणार असून जी प्रकरणे महत्त्वाची नाहीत त्यांना पुन्हा तारखांवर तारखा मिळण्याची शक्यता आहे. याकाळात केवळ महत्त्वाच्या खटल्यांवर सुनावणी होणार आहे. तसेच त्याच खटल्यातील पक्षकार, वकिलांना न्यायालयात प्रवेश देण्यात येणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत हे नियम लागू असणार आहेत.-----------------------------------------प्रत्येक शनिवारी कामकाज बंद :

वीकेंड लॉकडाऊनमुळे प्रत्येक शनिवारी न्यायालयास देखीस सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे शनिवारी कामकाज बंद राहणार आहे. ज्या दावे किंवा खटल्यांमध्ये युक्तिवाद पूर्ण झाला आहे. त्या प्रकरणांचे निकाल वा आदेश पारित केले जाणार आहेत.---------------------------------------------------------’न्यायालयात विनाकारण गर्दी होऊ नये म्हणून तारीख व महत्त्वाचे काम असणा-या वकील-पक्षकारांना न्यायालयाच्या आवारामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळावी. न्यायालयीन कामकाज नेमके कसे चालणार याबाबत येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीशांचे आदेश येतील- अ‍ॅड. सचिन हिंगणेकर, उपाध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCourtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय