शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

आरोपीकडून पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता; विशाल अग्रवालचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:13 IST

Pune Porsche Car Accident विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला

Pune Porsche Car Accident: पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी कारागृहात असलेल्या विशाल अग्रवाल याने आई आजारी असल्याने तात्पुरता जामीन मिळण्यासाठी केलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी फेटाळला. गुन्ह्याचे स्वरूप, गुन्ह्याचे गांभीर्य, शिक्षेची तीव्रता, खटल्याद्वारे आधारलेल्या सामग्रीचे स्वरूप, साक्षीदारांशी छेडछाड करण्याची वाजवी भीती आणि जनतेच्या हितसंबंधांचा विचार करता, या टप्प्यावर आरोपीला तात्पुरत्या जामिनावर सोडण्याचे कोणतेही न्यायिक कारण दिसत नाही, असे नमूद करीत अर्ज नामंजूर केला. 

कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघात प्रकरणात मुलाच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अरुणकुमार सिंग यांनी अश्पाक मकानदार, अमर गायकवाड, आदित्य सूद, आशिष मित्तल यांच्याशी संगनमत करून शिपाई अतुल घटकांबळेमार्फत ‘ससून’च्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना लाच दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला महिला असल्याकारणाने मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. विशाल अग्रवाल यानेही आई आजारी असल्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, जामीन अर्जावर युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील शिशिर हिरे म्हणाले, आईचा आजार हा वयाशी संबंधित आजार आहे आणि तिच्या जिवाला कोणताही तत्काळ धोका नाही. ॲक्युट डिसिज म्हणजे अचानक आजार. अर्जदार आरोपीच्या आईची कंबरेच्या मणक्याची शस्त्रक्रिया ही नियोजित शस्त्रक्रिया आहे. आरोपीचे वडील, बहीण, पत्नी, मुलगा, मेहुणे आरोपीच्या आईची काळजी घेऊ शकतात. अर्जदार आरोपीकडून खटल्यातील पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे. शिवाय, मागितल्याप्रमाणे तात्पुरता जामीन मंजूर केल्याने खटल्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज फेटाळण्यात यावा तर बचाव पक्षाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून अर्ज मंजूर करण्याचा विचार करावा, अशी विनंती न्यायालयाला केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी विशाल अग्रवालचा जामीन अर्ज फेटाळला.

टॅग्स :PuneपुणेPune Porsche Accidentपुणे पोर्श अपघातCourtन्यायालयPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातHealthआरोग्य