शहरं
Join us  
Trending Stories
1
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
2
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
3
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
4
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
5
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
6
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
7
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
8
शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
9
शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
10
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
11
Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर
12
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
13
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
14
मुख्यमंत्र्यांचा फोन येताच उमेदवारी घेतली मागे! बंडखोरी रोखण्यात भाजपला यश; उद्धवसेना मात्र अपयशी
15
पत्नीच्या हातात-पायाला इलेक्ट्रिक वायर गुंडाळल्या अन्...; अनैतिक संबंधाच्या संशयाने पती बनला हैवान!
16
संस्कार असावे तर असे! भर कार्यक्रमात अहान शेट्टी सनी देओलच्या पडला पाया, अभिनेत्याचं होतंय कौतुक
17
सरकारचा एक निर्णय आणि सरकारी कंपनीलाच जोरदार झटका; २ दिवसांत झालं ११,००० कोटी रुपयांचं नुकसान, प्रकरण काय?
18
नेपाळमध्ये काळजाचा ठोका चुकला! ५५ प्रवाशांना घेऊन उतरणारे विमान धावपट्टीवरून घसरले
19
तब्बल ६६ नगरसेवक बिनविरोध; भाजपचे सर्वाधिक ४३, शिंदेसेनेचे १९; ...तर आयोग करणार तपास
20
मनधरणी, तणाव अन् खून...! मुंबईत भाजप-शिंदेसेनेची ठाकरे बंधूंशी थेट लढत, ठाण्यात ७, कल्याण-डोंबिवलीत २०, भिवंडीत ६ उमेदवार बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

नांदत्या संसाराला गालबोट लावून नवा घरोबा थाटणाऱ्याचे न्यायलयाने उपटले कान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 20:08 IST

नांदत्या संसाराची राखरांगोळी करुन नवा संसार थाटणा-या उच्चशिक्षित नवरोबाला न्यायालयाने चांगलीच अद्द्ल घडविली आहे.

ठळक मुद्देथकलेला कर आणि घराच्या देखभालीसाठी साडेपाच लाख :पत्नीसह दोन मुलांना दरमहा ३० हजार रुपये देण्याचा न्यायालयाचा आदेश

पुणे : नांदत्या संसाराची राखरांगोळी करुन नवा संसार थाटणा-या उच्चशिक्षित नवरोबाला न्यायालयाने चांगलीच अद्द्ल घडविली आहे. पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला दिलेल्या त्रासाबद्द्ल त्याचे कान उपटले आहेत. त्याच्या या कृत्यामुळे यापुढे घराच्या थकलेल्या करासहीत देखभालीचा पाच लाख रुपये खर्च दरमहा देण्यास सांगितले आहे. याबरोबरच तसेच याचिका दाखल झाल्यापासून पत्नीसह दोन मुलांना प्रत्येकी १५ हजार रुपये आणि त्यांना प्रत्येक महिन्याला दहा हजार यानुसार महिन्याला ३० हजार रुपये  देण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत.  सरिता आणि अमित ( नावे बदलली आहे ) परस्पर संमतीने जुलै १९९७ रोजी दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर काही वर्षातच अमितने त्याचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केली. त्याचा बाहेरख्यालीपणा वाढु लागला. याविषयी सरिताला काहीच माहिती नव्हती. अचानक एक दिवस तिला आलेल्या फोन वरुन आपल्या नवऱ्याच्या ‘प्रेमप्रकरणाची आणि लग्नाची’ माहिती झाली. याविषयी त्याला जाब विचारताच अमितने सरिताला त्रास देण्यास सुरुवात केली.  त्यांच्यातील वादाचे पर्यवसान भांडणात झाले. रागाच्या भरात अमितने सरिताला इमारतीवरून खाली फेकून देऊन तिला जिवे  मारण्याची धमकी दिली. मुलांवर वडिलांच्या अशा वागण्याचा गंभीर परिणाम झाला. या भीतीमुळेच ते तिघे चक्क आपल्या खोलीला कुलूप लावून झोपायचे. पोलिस ठाण्यात पती विरोधात तक्रार केल्यानंतरही अमितचा त्रास सुरूच होता.  एका मध्यरात्री त्याने मुलांसमोर चाकुचा धाक दाखवून धमकी दिली. यासगळ्यातून त्याने मुलांचे काही बरे वाईट करू नये म्हणून सरिता मुलांसोबत वेगळी राहू लागली. अमितने तिचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले. त्यातून सरिता देहविक्री करत असल्याची बदनामी करण्याचा प्रयत्न  केला. त्यासाठी त्याने पोलिस आयुक्तालय गाठले. मात्र हे फोटो बनावट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याचे पितळ उघड पडले. यासगळ्यात सरिताला चांगल्या पगाराची नोकरीही सोडावी लागली.एकदा अमितने तिला घराबाहेर गाठून तिच्यावर पिस्तुलातून गोळया झाडून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारही झाली. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आले. या सर्व त्रासातून जात असताना सासूच्या सांगण्यावरून २०१२ मध्ये पतीवर केलेले आरोप तिने मागे घेतले. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्हा माघार घे, पती सुधारेल, जर तो पुन्हा वाईट वागला तर मी माझ्या घरी आसरा देईल अशा आश्वासनांमुळे तिने साक्ष फिरवली. मात्र त्याचा काही एक उपयोग झाला नाही. एक दिवस झालेल्या भांडणातून तोच घराबाहेर पडला. परंतु, तो पुन्हा घरी आलाच नाही. चौकशी अंती काही महिन्यांनंतर एका महिलेने स्वत़:  सरिताला २००९ ला अमितने आपल्यासोबत धर्मांतर करून निकाह केल्याचे सांगितले. सरिताची मुलगी आता २१ वर्षांची तर मुलगा १५ वर्षांचा आहे.   

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयrelationshipरिलेशनशिप