नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 21:55 IST2025-12-11T21:54:18+5:302025-12-11T21:55:02+5:30

घायवळ विरोधातील खटल्यात अॅड. शिशीर हिरे यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याचा पोलिसांचा प्रस्ताव

court has declared gangster Nilesh Ghaywal who fled abroad as a fugitive | नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता

नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता

पुणे : परदेशात पळून गेलेल्या गँगस्टर नीलेश घायवळ याला न्यायालयाने फरार घोषित केले आहे. त्याचवेळी नीलेश घायवळ याच्याविरूद्धच्या खटल्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ शिशीर हिरे यांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव पोलिसांनी राज्य शासनाकडे पाठवला असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

नीलेश घायवळ हा गेल्या काही महिन्यांपासून बनावट पासपोर्टवर परदेशात पळून गेला आहे. पोलिसांनी त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. तसेच इंटरपोलच्या सहाय्याने त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस काढली आहे. नीलेश घायवळ याचा साथीदार अजय सरोदे याला एजंट नीलेश फाटक याने शस्त्र परवाना मिळवून दिला होता. अशा प्रकारे नीलेश फाटक याने नीलेश घायवळ याच्या १५ साथीदारांना शस्त्र परवाना मिळवून दिले आहेत. त्या सर्व शस्त्र परवान्याची चौकशी करण्यात सुरुवात केली आहे.

नीलेश घायवळ याच्याविरुद्ध दाखल असलेल्या सर्व गुन्ह्यांसाठी अॅड. शिशीर हिरे यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, असा प्रस्ताव पोलिसांनी गृह विभागाकडे पाठवला असल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. त्याचबरोबर आर्म अॅक्ट, सिम कार्ड तसेच बनावट नंबर प्लेट लावून फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, ३ ते ४ दिवसात बनावट पासपोर्ट प्रकरणाचे दोषारोपपत्र देखील न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

मुख्य न्यायदंडाधिकारी के. पी. जैन-देसरडा यांनी नीलेश घायवळ याला नुकतेच फरार घोषित केले आहे. त्यामुळे नीलेश घायवळ याच्या मालमत्ता सील करणे पोलिसांना सुकर होणार असल्याचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

Web Title : गैंगस्टर नीलेश घायवाल भगोड़ा घोषित; संपत्ति जब्त होने की संभावना

Web Summary : विदेश भागे गैंगस्टर नीलेश घायवाल को न्यायालय ने भगोड़ा घोषित किया। पुलिस उसके मामलों के लिए विशेष लोक अभियोजक की तलाश कर रही है और उसके सहयोगियों के हथियार परमिट की जांच शुरू कर दी है। अधिकारी उसकी संपत्ति जब्त करने और जालसाजी से संबंधित आरोप दायर करने की तैयारी कर रहे हैं।

Web Title : Gangster Nilesh Ghaywal Declared Absconder; Property Likely to Be Seized

Web Summary : Nilesh Ghaywal, a gangster who fled abroad, has been declared an absconder by the court. Police are seeking a special public prosecutor for his cases and have begun investigating his associates' weapon permits. Authorities are preparing to seize his assets and file charges related to forgery.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.