शहरं
Join us  
Trending Stories
1
विकणाऱ्याला अटक, मग विकत घेणाऱ्याला का नाही?, अंबादास दानवेंचा पार्थ पवारांना अडचणीत आणणारा सवाल
2
पश्चिम बंगालमध्ये बाबरी बांधण्याची घोषणा केलेली; ममता बॅनर्जींनी आमदाराला पक्षातून निलंबित केले
3
थायलंड फिरायला गेले, पण मृत्यूनं गाठलं; दोन्ही मित्र स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत! नेमकं काय झालं?
4
हायवेवरील ट्रकला कारने दिली जोरदार धडक; ४ डॉक्टरांचा जागीच मृत्यू, आई वडिलांचं स्वप्न भंगलं
5
एखाद्या ‘सुंदरी’चा फोटो तीन मिनिटांत करू शकतो तुमचे बँक खाते रिकामे, ऑनलाइन व्यवहार करताना सावध रहा
6
High Tide Mumbai: चार दिवस समुद्राला मोठी भरती; साडेचार मीटरपेक्षा अधिक उंच लाटा
7
२८ वर्ष जुन्या मित्राला सोबत घेण्यासाठी भाजपाच्या हालचाली?; पुन्हा समीकरणे जुळवण्याची तयारी
8
VIDEO ...अन् रोहितनं केली रिषभ पंतची इच्छापूर्ती! पण हिटमॅननं काय विश मागितली असेल बरं?
9
चेहऱ्यावर पदर, हातात गिटार... 'मैंने कभी सोचा ना था' गाण्याने व्हायरल झालेली नववधू आहे कोण?
10
OnePlus Ace 6T: 'इतकी' मोठी बॅटरी...! वनप्लसनं बाजारात आणलाय दीर्घकाळ टिकणारा फोन, किंमत किती?
11
Dhule Crime: मौजमज्जा करण्यासाठी बी. टेकच्या विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वतःच्याच घरावर टाकला दरोडा; १० तोळे सोने चोरले
12
‘कायद्यात त्वरित बदल करा’, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजार समित्या उद्या बंद, व्यापाऱ्यांचे आंदोलन 
13
VIDEO: बाबाजी का ठुल्लू... विराट कोहलीचे मजेशीर हावभाव, विकेट पडताच मैदानात धमाल-मस्ती
14
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
15
'सेन्यार'चा कहर थांबेना; थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया अन् श्रीलंका पूरामुळे बेजार! १४००हून अधिक लोकांचा मृत्यू 
16
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
17
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
18
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
19
Sheetal Tejwani: पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
20
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही - प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 12:25 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश कायद्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे असल्याचा आहे

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मतदान आणि मतमोजणी स्थगित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश कायद्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला. या चुकीच्या आदेशामुळे नवीन पेच निर्माण झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया धोक्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने राजपत्रामध्ये १० डिसेंबर २०२५ ही निकाल जाहीर करण्याची अंतिम मुदत निश्चित केली आहे. एकदा निवडणूक प्रक्रिया सुरू झाली की कोणत्याही न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. संविधानातील कलम २४३ (ओ)स्पष्टपणे सांगते की निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतेही न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. नागपूर खंडपीठाने मतमोजणीची तारीख पुढे ढकलताना ज्यावर आधार घेतला तो जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल दिलाच गेलेला नाही. त्यामुळे हा निर्णय कायदेशीरदृष्ट्या अपुरा आणि चुकीचा आहे. निवडणुकीच्या संदर्भात कोर्टाचा हस्तक्षेप वाढत चालला आहे, ज्यामुळेनिवडणूक प्रक्रिया अडचणीत येत आहे. तसेच नागपूर येथे मतमोजणी पुढे ढकलण्याची याचिका दाखल करणारा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला.

मुख्य न्यायाधीशांनी हस्तक्षेप करावा

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सुमोटो पद्धतीने प्रकरण ताब्यात घेऊन थांबवलेली मतमोजणी सुरू करण्याचे निर्देश द्यावेत. राजकीय पक्षांनी जेलमध्ये जाण्याची भीती बाळगू नये. तुमच्या लीगल सेलद्वारे ठाम भूमिका घ्यावी. निवडणूक आयोग स्वतः सांगत आहे की, अंतिम मुदतीपूर्वी निवडून आलेल्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत. गेल्या आठवड्यात निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरणात मुंबई हायकोर्टाने स्वतः मान्य केले होते. याचिकाकर्त्यांची बाजू न्यायसंगत आहे; पण निवडणुका सुरू असल्याने २४३(ओ) नुसार हस्तक्षेप करता येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. त्यामुळे मुख्य न्यायाधीशांनी निर्णय घेण्याची मागणी आंबेडकरांनी केली.

ईव्हीएम टॅम्परिंग आणि व्हीव्हीपॅटचा अभाव

आंबेडकरांनी ईव्हीएमच्या चिप्सच्या निर्मितीबद्दल आणि त्या भारतात बनतात की बाहेर, तसेच त्याचे कोड इलेक्शन कमिशनला दिले आहेत की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केले. गेले २० वर्षे टॅम्परिंगचा आरोप होत असून, निवडणूक आयोगाकडे पुरेशा ईव्हीएम मशीन नाहीत आणि व्हीव्हीपॅटही नाहीत, म्हणूनच निवडणुका दोन टप्प्यांत घेतल्या जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Court can't interfere in election process: Prakash Ambedkar

Web Summary : Prakash Ambedkar criticizes court interference in local body elections, deeming it beyond jurisdiction. He highlights constitutional provisions preventing court intervention once the election process starts. He also raised concerns about EVM transparency and VVPAT verification.
टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMumbai High Courtमुंबई हायकोर्टVotingमतदान