Pune | बोपदेव घाटात भरदिवसा जोडप्याला मारहाण करून लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 12:00 IST2023-02-14T11:58:01+5:302023-02-14T12:00:48+5:30

रविवारी भरदुपारी एका युगुलाला मारहाण करून लुटण्याचा प्रकार समोर...

couple was beaten and robbed in broad daylight at Bopdev Ghat pune crime | Pune | बोपदेव घाटात भरदिवसा जोडप्याला मारहाण करून लुटले

Pune | बोपदेव घाटात भरदिवसा जोडप्याला मारहाण करून लुटले

पुणे : बोपदेव घाटातील टेबल पॉईंटवर फिरायला येणाऱ्या युगुलांना मारहाण करून लुटण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून एका टोळीला पकडले हाेते. त्यानंतरही रविवारी भरदुपारी एका युगुलाला मारहाण करून लुटण्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी २४ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी तरुण आपल्या मैत्रिणीबरोबर दुचाकीवरून फिरायला बोपदेव घाटात गेले होते. ते टेबल पॉईंट येथे थांबले. तेथून ते निघाले असताना दोघे जण तेथे आले. फिर्यादींना हाताने मारहाण करून त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोनसाखळी हिसकावून पळून गेले. सहायक पोलिस निरीक्षक मोहिते अधिक तपास करीत आहेत.

Web Title: couple was beaten and robbed in broad daylight at Bopdev Ghat pune crime