शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळल्याशिवाय देश सक्षम होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:58+5:302021-01-08T04:30:58+5:30

भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयाचे सभागृहात सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त आयोजित सावित्रीबाई फुले विचार महोत्सवात भोसले बोलत होत्या. ...

The country will not be able to function without the right to education for all | शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळल्याशिवाय देश सक्षम होणार नाही

शिक्षणाचा अधिकार प्रत्येकाला मिळल्याशिवाय देश सक्षम होणार नाही

भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयाचे सभागृहात सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त आयोजित सावित्रीबाई फुले विचार महोत्सवात भोसले बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डाॅ. वृषाली रणधीर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डाॅण मनोहर जाधव, महसूलचे सहा. आयुक्त संतोष हराळे, जेजुरी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त

प्रसाद शिंदे, प्राचार्य डाॅ. प्रसन्नकुमार देशमुख, फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक डाॅ. प्राण रोहिदास जाधव, डाॅ. प्रदीप पाटील, डाॅ. अरुण बुरांडे, डाॅ. सुरेश गोरेगावकर, रावसाहेब पवार, सुनंदा गायकवाड, विजया पाटील, सविता कोठावळे, हसीना शेख, सुजाता दळवी, प्राचार्य मोहन ताकवले, सुरेश साळुंके उपस्थित होते.

या वेळी प्रा. अनुराधा भोसले यांचा राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले सामाजिक कार्यगौरव पुरस्काराने शाल श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन डा़ॅ. मनोहर जाधव यांचे हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी संतोष हराळे, डा़ॅ. प्रसन्नकुमार देशमुख, डाॅ. मनोहर जाधव यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली.

अध्यक्षीय भाषणात डाॅ. वृषाली रणधीर यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. सुजाता भालेराव यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.सौ. कोठावळे व सुजाता भालेराव यांनी केले. आभार अशोक शिंदे यांनी मानले.

अनुराधा भोसले यांचा सत्कार करताना फुले-शाहू-आंबेडकर विचार प्रसार मंडळ(((((((((*

Web Title: The country will not be able to function without the right to education for all