शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराची एसीबीकडे तक्रार करणार

By admin | Updated: July 1, 2015 23:50 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सध्याची स्थायी समिती म्हणजे महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट समिती आहे. विविध साहित्यांच्या खरेदीत होणारी अनियमितता

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची सध्याची स्थायी समिती म्हणजे महापालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट समिती आहे. विविध साहित्यांच्या खरेदीत होणारी अनियमितता आणि भ्रष्टाचाराबाबत पुराव्यासह माहिती देऊनही ही समिती केवळ टक्केवारीसाठी एकामागोमाग एक खरेदीच्या प्रस्तावांना मंजुरी देत आहे. त्यामुळे महापालिकेच्या साहित्य खरेदीतील भ्रष्टाचाराबाबत राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार करणार आहे. चौकशीसाठी उच्च न्यायालयात जाऊ, असे नगरसेविका सीमा सावळे, आशा शेंडगे यांनी सांगितले.शहरवासीयांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनेंतर्गत, तसेच विविध विभागांसाठी साहित्य खरेदीचा सपाटा लावला आहे. मात्र या साहित्याची बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी होत आहे. त्यामुळे साहित्यखरेदीशी संबंधित विभागाचे अधिकारी, ठेकेदार, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी, स्थायी सदस्यांचे उखळ पांढरे होत आहे. याबाबत सावळे, शेंडगे म्हणाल्या, ‘‘वायसीएम रुग्णालयासाठी सोनोग्राफी मशिन, कमी ऐकू येणाऱ्या नागरिकांना वाटपासाठी श्रवणयंत्र, महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी खुर्च्या, नोटा मोजणाऱ्या मशिन, यूपीएस, डिजिटल प्रिंटर, शिलाई मशिन बाजारभावापेक्षा जादा दराने खरेदी होत आहे. त्यासाठी निविदेतील अटी व शतीर्ही धाब्यावर बसविल्या आहेत. याशिवाय केमिकलचा व्यवसाय करणाऱ्या ठेकेदाराकडून दहा हजार सायकलींची खरेदी होत आहे. (प्रतिनिधी)निविदेतील अटी व शर्तींचे पालन केले गेलेले नाही. तसेच सुरक्षारक्षक आणि ट्रॅफिक वॉर्डन नियुक्तीसाठी राज्य सरकारच्या अध्यादेशाला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखविली आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे देऊनही आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. तसेच स्थायी समितीनेही साहित्यांच्या खरेदीसाठी निविदेतील अटी व शर्तींचे पालन केले आहे किंवा नाही याची चौकशी केलेली नाही. स्थायी समितीला केवळ टक्केवारीत रस असल्याचे पाहायला मिळत आहे. करदात्या नागरिकांच्या पैशांचा योग्य विनियोग होतो किंवा नाही, याची पडताळणी न करताच साहित्य खरेदीच्या प्रस्तावाला स्थायीत मंजुरी दिली जात आहे, असे शेंडगे आणि सावळे यांनी सांगितले.