शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकांनीच दाखविला ठेंगा

By admin | Updated: March 18, 2015 00:39 IST

अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागासाठी समान निधीचे वाटप झाले नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असली, तरी या अंदाजपत्रकाच्या मान्यतेस पालिकेतील १५७ पैकी केवळ १६ सदस्य उपस्थित होते.

पुणे : अंदाजपत्रकात प्रत्येक प्रभागासाठी समान निधीचे वाटप झाले नसल्याची टीका विरोधी पक्षांकडून केली जात असली, तरी या अंदाजपत्रकाच्या मान्यतेस पालिकेतील १५७ पैकी केवळ १६ सदस्य उपस्थित होते. याच सदस्यांनी अंदाजपत्रकाबाबत आपली भूमिका सभागृहात मांडण्याची तसदी घेतल्याचे मंगळवारी दिसून आले.स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बापूराव कर्णेगुरुजी यांनी मागील महिन्यात २७ फेब्रुवारीला २०१५-१६ चे अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकात विरोधी पक्षांना निधी देताना आखडता हात घेतल्याने सेना, भाजप, तसेच मनसेच्या नगरसेवकांमध्ये नाराजी होती. तसेच राष्ट्रवादीसमवेत सत्तेत असलेल्या कॉँग्रेसच्या काही सदस्यांच्या तरतुदीलाही कात्री लावण्यात आली होती. त्यामुळे अंदाजपत्रकावरील चर्चा वादळी होण्याची शक्यता होती. प्रत्यक्षात सकाळी ११ वाजता सभा सुरू झाल्यानंतर केवळ मोजकेच सदस्य होते. त्यानंतर सुमारे ४० ते ५० सदस्यांनी सभागृहात हजेरी लावली. ही सभा सुमारे साडेसात तास चालली. त्यात, कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांच्यासह उपमहापौर आबा बागूल यांनी भाषणे केली. तर, राष्ट्रवादीकडून बंडू केमसे, बाबूराव चांदेरे , मीनल सरवदे, सभागृहनेते सुभाष जगताप यांची भाषणे झाली. शिवसेनेकडून गटनेते अशोक हरणावळ, सोनम झेंडे, संगीता ठोसर यांनी भाषणे केली. तर, मनसेचे गटनेते बाबू वागसकर, वसंत मोरे, किशोर शिंदे, वनीता वागसकर, पुष्पा कनोजिया, अस्मिता शिंदे, रूपाली पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला, तर भाजपाकडून नगरसेविका मुक्ता टिळक, धनंजय जाधव, मंजूषा नागपूरे, माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी अंदाजपत्रकावर मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)अंदाजपत्रकावरील चर्चा सुरू होताच काही मिनिटांतच सभागृह रिकामे होण्यास सुरूवात झाली. दुपारी जेवणानंतर सभागृहात अवघे २५ ते ३० नगरसेवक उपस्थित होते. त्यानंतर ही संख्या आणखी कमी झाली. अखेर साडेसहा तास चर्चा चालल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास अवघ्या १६ सदस्यांच्या उपस्थितीत अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. मात्र, प्रमुख नगरसेवक भाषणे करून निघून गेल्याने उपस्थित सदस्यांनी याबाबत महापौरांकडे नाराजी व्यक्त केली.