शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

सभेतच नगरसेवकांत हाणामारी

By admin | Updated: June 21, 2016 00:30 IST

पाणीटंचाई संदर्भात जुन्नर नगरपालिकेने बोलाविलेल्या तातडीच्या सभेतच सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी एकमेकांचा पाणउतारा करत चर्चा

जुन्नर : पाणीटंचाई संदर्भात जुन्नर नगरपालिकेने बोलाविलेल्या तातडीच्या सभेतच सत्ताधारी राष्ट्रवादी व विरोधी शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी एकमेकांचा पाणउतारा करत चर्चा न करता खुर्च्या फेकून मारण्याचा प्रकार घडला. मुद्द्यावरून गुद्द्यावर येण्याचा लाजीरवाणा प्रसंग नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला. राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे व शिवसेना गटनेते मधुकर काजळे यांच्यात ही बाचाबाची व धराधरी झाली. माणिकडोह धरणाची पाणीपातळी खालावल्याने तसेच कुकडी नदी कोरडी पडल्याने शहरात १९७२ तसेच १९८४ नंतर सध्या शहरात तशी पाणीटंचाई भासत आहे. शहरात अवघा ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा बंधाऱ्यात असल्याने चार दिवसाआड नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिकेच्या वतीने तातडीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते.सभेची चर्चा पुढे जात असतानाच, शिवसेनेचे गटनेते आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी खटाटोप करतात, कामांची प्रसिद्धी करतात, असा आरोप माजी नगराध्यक्ष दिनेश दुबे यांनी मधुकर काजळे यांच्यावर केला. त्याला काजळे यांनी प्रत्युत्तर दिल्याने वादाला अधिकच तोंड फुटले. याच वादावादीतून एकमेकांवर खुर्र्च्या फेकण्याचा, पाण्याच्या बाटल्या फेकण्याचा प्रकार घडला. दरम्यान, शाब्दिक चकमकीबरोबरच अश्लाघ्य भाषेत धराधरीचा प्रसंग गुदरला. हे पाहून महिला नगरसेवकांनी काढता पाय घेतला तर सभागृह अवाक झाले. सभागृहात सर्वपक्षीय १३ नगरसेवक असताना हा प्रकार घडला. त्यातच मध्यस्थी करण्यासाठी माजी उपनगराध्यक्ष शाम पांडे यांनी प्रसंगावधान दाखविल्याने पुढील प्रसंग टळला. दरम्यान, नगरपालिका सभागृहात झालेल्या गोंधळाचा आवाज मोठ्याने बाहेर आल्याने नागरिकांची सभागृहाबाहेर गर्र्दी झाली. (वार्ताहर) कोणालाही अंगावर घेण्याची तयारी...याबाबत सत्ताधारी पक्षाचे दिनेश दुबे यांना विचारले असता ते म्हणाले, की शिवसेना गटनेते काजळे यांनी एकही विकासकाम केलेले नाही. कोणताही निधी विकासासाठी आणलेला नाही. सत्ताधारी म्हणून आम्ही विकासकामे केली. असे असताना केवळ श्रेय लाटण्यासाठी प्रसिद्धीचा खटाटोप करतात. आमचे बहुमत असतानादेखील विरोधी सदस्यांचे ठराव जनतेच्या हितासाठी आम्ही स्वीकारले. विधायक कामासाठी राजकारण केले नाही. तरीही जर नागरिकांच्या कामात कोणी अडथळे आणत असेल तर त्यासाठी कोणालाही अंगावर घेण्याची आमची तयारी आहे. झालेला प्रकारदेखील नागरिकांच्या हितासाठी घडला आहे.दडपशाहीला भीक घालणार नाही...शिवसेना गटनेते काजळे यांना विचारले असता, सत्ताधारी नगरसेवकांनी शहरातील महत्त्वाच्या समस्या सोडविता येत नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन पालिका सभागृहात दबंगशाही दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र आमची भूमिका ही नागरिकांच्या हितासाठीच आहे. विरोधी पक्षाला विरोधीपणाने काम करावेच लागते. सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला भीक घालणार नाही. नागरिकांसाठी विधायक विरोध करतच राहणार. सत्ताधाऱ्यांचे अपयश उघड करण्यासाठी प्रसंगी आमची विरोधाची भूमिका अधिक तीव्र होईल.