शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

Coronavirus : कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यावर आपल्याला जायचेच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 1:21 PM

‘कोरोना बहुत ही स्वाभिमानी है, वो तब तक आपके घर नही आएगा जब तक आप उसे लेने खुद बाहर नही निकलते’..

ठळक मुद्देप्रत्येकाने संकल्प करावा : सोशल डिस्टन्सिंगला प्राधान्य द्या, गर्दी टाळा, स्वच्छता पाळा सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर

प्रज्ञा केळकर-सिंग - पुणे : ‘कोरोना बहुत ही स्वाभिमानी है, वो तब तक आपके घर नही आएगा जब तक आप उसे लेने खुद बाहर नही निकलते’, असा संदेश सध्या सोशल मीडियावर पसरतो आहे. सध्या भारतातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दुसºया टप्प्यावर आहे. पहिल्या टप्प्यात परदेशातून आलेले नागरिक, दुसऱ्या टप्प्यात बाधित किंवा संशयितांच्या संपर्कात आलेले नागरिक, तर तिसऱ्या टप्प्यात स्थानिक नागरिकांमध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपल्याला तिसऱ्या टप्प्यात जायचे नाही, असा संकल्प प्रत्येक नागरिकाने आता करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही जनतेला आवाहन केले आहे. त्यामुळे सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग’ अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.भारतातील कोरोनाबाधितांची संख्या दररोज वाढत आहे. सध्या भारत कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यावर आहे. कोरोनाबाधित देशांमधून आलेल्या भारतीय व्यक्तींना आणि त्यांच्या संपर्कातील नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.तिसºया टप्प्यात देशातील व्यक्तींना कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. संसर्ग झालेल्यांची संख्या सातत्याने वाढत राहिली तर आपल्याला तिसºया टप्प्याला सामोरे जावे लागेल आणि त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड होईल, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे, गर्दीची ठिकाणे टाळण्याची प्रत्येकाने स्वत:वर सक्ती करुन घ्यावी, शासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्त अवलंबावी, यासाठी आवाहन केले जात आहे. चीननंतर इटली, जर्मनी, इराण यांसारख्या अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक वेगाने वाढला आहे. सध्या आपण दुसºया टप्प्यावर असल्याने तिथेच प्रसार रोखणे गरजेचे असते. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत..........परदेशातून आलेल्या लोकांचे तातडीने विलगीकरण केले जात आहे. आवश्यक ती सर्व काळजी यंत्रणेकडून घेतली जात असली तरी वैयक्तिक पातळीवर सतर्क राहणे जास्त गरजेचे आहे. कोरोनाच्या संसर्गामध्ये हाताचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे सातत्याने हात धूत राहणे, हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. आताच काळजी न घेतल्यास रुग्णांची संख्या वेगाने वाढू शकेल. त्यामुळे विनाकारण प्रवास टाळा, शक्यतो घराबाहेर पडू नका .- डॉ. मोहन जोशी,माजी अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन.............तिसºया टप्प्यामध्ये कोरोनाचा संसर्ग एका स्थानिक व्यक्तीकडून दुसºया स्थानिक व्यक्तीला होऊ शकतो. तिसºया टप्प्यात रुग्णांची संख्या अचानक वाढू शकते. त्यामुळे सध्या ‘सोशल डिस्टन्सिंग’वर प्राधान्याने भर देण्याची गरज आहे. ‘गेट टुगेदर’ टाळणे, जास्त लोकांनी एकत्र न येणे, घरातही स्वच्छता पाळणे, सतत हात धूत राहणे यावर भर देण्याची गरज आहे. ही काळजी घेतल्यास संसर्गाचा वेग मंदावता येऊ शकतो आणि तिसºया टप्प्यातील धोका टळू शकतो.- डॉ. प्राची साठे, आयसीयू विभागप्रमुख, रुबी हॉल क्लिनिक.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका