CoronaVirus in Pune: पुणेकरांना काहीसा दिलासा; नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या स्थिरावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 22:42 IST2021-04-15T22:42:06+5:302021-04-15T22:42:14+5:30
CoronaVirus in Pune: पुणे शहरात कोरोना रुग्णवाढ सातत्याने सुरु होती. शहरात एकाच दिवशी जवळपास ७००० रुग्ण सापडण्यापर्यंत हे प्रमाण गेले होते.

CoronaVirus in Pune: पुणेकरांना काहीसा दिलासा; नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या स्थिरावली
पुणेकरांसाठी काहीसा दिलासा देणारी ही बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत जाणारी रुग्णसंख्या (CoronaVirus) आता काहीशी कमी होत स्थिरावली आहे. टेस्ट पॅाझिटिव्हीटी रेशो अर्थात चाचण्यांच्या तुलनेत दिसणारे रुग्णसंख्येचे प्रमाण आता कमी होताना दिसत आहे. अर्थात पुढचे काही दिवस ही घट अशीच कायम राहिली तरच दुसरी लाट कमी होण्याची चिन्ह दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (5395 corona patient found in pune in last 24 hours.)
पुणे शहरात कोरोना रुग्णवाढ सातत्याने सुरु होती. शहरात एकाच दिवशी जवळपास ७००० रुग्ण सापडण्यापर्यंत हे प्रमाण गेले होते. पण आता मात्र गेल्या काही दिवसात यामध्ये दिलासा मिळालेला दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेशो हा २५% ते २१ % पर्यंत आलेला पहायला मिळत आहे. ३० टक्क्यांच्या वर गेलेले हे प्रमाण कमी होणे ही नक्कीच दिलासादायक बाब ठरत आहे.
आज देखील शहरात 21922 चाचण्या झाल्या तर यामध्ये 5395 रुग्ण पॅाझिटिव्ह आढळले. यानुसार टेस्ट पॅाझिटिव्हिटी रेट हा २४.६% आहे. ३३% वर गेलेला हा रेट २४% वर येणं हा शहरासाठी दिलासा मानला जात आहे.
अर्थात टेस्टींग देखील काही प्रमाणात कमी झाले आहे. महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॅा. संजीव वावरे म्हणाले “ गेल्या ४-५ दिवसांत हा रेशो कमी होवुन त्याचा प्लॅटु झालेला दिसतो आहे. म्हणजे हे प्रमाण स्थिर झाले आहे. साधारण १० ते १५ दिवस हे प्रमाण असेच राहीले तर तो दिलासा ठरेल”