coronavirus : दिलासादायक ! काेराेनाच्या चाचणीचे प्रमाण वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:26 IST2020-03-30T19:25:14+5:302020-03-30T19:26:35+5:30
काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमिवर भारतातील १७ कंपन्यांना आयसीएमआरने काेराेनाची चाचणी करणारे किट तयार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

coronavirus : दिलासादायक ! काेराेनाच्या चाचणीचे प्रमाण वाढणार
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना काही दिवसांपूर्वीच शासनातर्फे काही खाजगी प्रयोगशाळांना कोरोनाच्या चाचणीची परवानगी देण्यात आली. कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारे किट जर्मनीहून मागवले जात असताना पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स या कंपनीने भारतीय बनावटीचे पहिले किट तयार केले. मायलॅबसह भारतातील १७ कंपन्यांना आयसीएमआरने किट बनवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे कोरोनाशी दोन हात करण्यासाठी भारतातील खाजगी क्षेत्रही सज्ज झाले आहे
आयसीएमआरने किट बनवण्यासाठी मान्यता दिलेल्या कंपन्या आणि संस्थांमध्ये अल्टोना डायग्नोस्टिक, मायलॅब, बीजीआय, क्रिशजेन बायोसिस्टिीम, एबीआय, हिमिडिया, हुवेल, आयआयटी दिल्ली, किल्पेस्ट, जेनेसिग, रोचे (३ किट), सिगेन,एसडी बायोसेन्सर, ऑम्प्लीजेन इंडिया बायोटेक (२ किट) यांचा समावेश आहे. आयसीएमआरच्या प्रोटोकॉलनुसार या कंपन्यांकडू किटची निर्मिती केली जात आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लषात घेऊन चाचणीचे प्रमाण वाढवावे लागणार आहे. त्यासाठी जास्त किटची गरज भासणार आहे. नवीन तंत्रदान भारतीयांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावे, यासाठी भारतीय बनावटीचे किट तयार करण्यात आले आहे.आयसीएमआरमध्ये किटच्या अचूकतेची चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती मायलॅबतर्फे देण्यात आली.
थायरोकेअर लॅबचे डॉ. सेनगुप्ता यांनी लोकमतला सांगितले, कोव्हिड-१९ च्या तपासणीसाठी लागणारे आरटी-पीसीआर प्रोब सुरुवातीला आयसीएमआर आणि एनआयव्हीतफे अमेरिकेकडून मागवण्यात आले आणि भारतातील सर्व प्रयोगशाळांना वितरित करण्यात आले. व्यावसायिक किटसच्या वापरालाही आयसीएमआरने मान्यता दिली आहे. आयसीएमआरला पूर्वकल्पना देऊन आणि परवानगी घेऊन असे किट प्रयोगशाळांना वापरता येतात. या सर्व किटची आयसीएमआरकडून चाचणी घेतली जाते. किटच्या माध्यमातून होणारे निदान अचूक असावे, यासाठी खबरदारी घेतली जाते.ह्ण
आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, कोरोनाची चाचणी केली जाते. परदेशात जाऊन आलेले लोक, त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती, लषणे दिसत असलेले संशयित रुग्ण आणि वैदयकीय षेत्रातील कर्मचारी यांची चाचणी प्राधान्याने केली जाते. आयसीएमआरने मान्यता दिलेले किट प्रयोगशाळांनी वापरणे बंधनकारक आहे. सध्या मेट्रोपोलीस लॅबमध्ये जर्मनीतील अल्टोना आणि पुण्यातील मायलॅबतर्फे तयार करण्यात आलेल्या किट वापरल्या जातात. शासनाकडून मान्यता मिळाल्यापासून आतापर्यंत आमच्याकडे ७०० हून अधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत.
- डॉ. निलेश शाह, समूह अध्यष, मेट्रोपोलीस हेल्थकेअर
प्रयोगशाळांना चाचणीसाठी मान्यता देण्यापूर्वी आयसीएमआरकडून मागवली जात असलेली माहिती :
- लॅबचे नाव, हेड आॅफिस, कलेक्शन साईटची संख्या आणि पत्ते
- आरटी-पीसीआर मशीनची संख्या, बायोसेफ्टी कॅबिनेटची संख्या
- कोव्हिड-१९ च्या चाचणीसाठी उपलब्ध असणारे रिएजंट