शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

Coronavirus : नाही म्हणजे नाही..! मुलांचे बाहेर खेळणे काही दिवस करा बंद....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 2:20 PM

मैदानांवर कोरोना विषाणू सहज शरीरात प्रवेश करू शकतात...

ठळक मुद्देकोरोनाची पार्श्वभूमी : पालकांनी घ्यावी पाल्यांची काळजी

पुणे : कोरोना या साथीच्या आजाराच्या भयंकर संकटामुळे शाळांना काही दिवसांसाठी सुटी मिळाली आहे. त्यामुळे दिवस-रात्र घरात असलेल्या लहान मुलांना सांभाळायचे कसे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यातूनच मग खेळायला चालला का जा मग, असे सांगत मुलांना घराबाहेर पाठवले जात आहे. मात्र यात धोका असून मुलांना घरातच ठेवा, किमान काही दिवस तरी बाहेर जाऊ देऊ नका, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.मुले प्रामुख्याने सोसायट्यांच्या बागांमध्ये, मैदानांमध्ये, तसेच गल्लीबोळात, रस्त्यांवर असे प्रकार जास्त दिसत आहेत. मुले एकत्र येऊन टीम तयार करतात, रस्त्यावर खेळतात. क्रिकेटपासून ते जुन्या लपाछपीपर्यंत असे कोणतेही खेळ त्यात असतात. मात्र हीच बाब मुलांसाठी धोकादायक आहे. संसर्ग सहज होण्यासारखीच ही परिस्थिती असल्यामुळे शक्यतो मुलांना घरातच ठेवावे, त्यासाठी घरात आहे त्या व्यक्तींनी त्यांना वेळ द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.क्रिकेटमधला चेंडू किंवा कोणत्याही खेळातील कोणतेही साहित्य त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाकडून हाताळले जाते. विषाणूचा संसर्ग यातून शक्य आहे. कोणता मुलगा आजारी आहे किंवा आजाराच्या उंबरठ्यावर आहे, हे काही ओळखू येत नाही. त्यामुळे संसर्ग कोणाकडून झाला, हेही सांगता येणार नाही. कोरोनाचा विषाणू संसर्ग त्वरित होत असल्यामुळेच गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका, असे सरकार सांगत आहे, त्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. शाळांना सुटी त्याचाच एक भाग आहे. मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवले तर हा उद्देशच साध्य होत नाही, असे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’बरोबर बोलताना स्पष्ट केले.बैठे खेळ खेळतानाही हा धोका आहेच. त्यात डोक्याला डोके लागते. मुले अगदी सहजपणे शिंकतात, खोकतात. हात स्वच्छ न करता सतत तोंडाला लावण्याची त्यांना सवय असते. काही खाण्याच्यापूर्वीही अनेकदा ते हात स्वच्छ करीत नाहीत. त्यामुळे बैठे खेळ खेळत असतानाही मुलांना संसर्ग होऊ शकतो. घरात कंटाळली, म्हणून मुलांनी बाहेर पाठविण्याचा हट्ट धरला तरीही त्यांना तसे करण्यास मज्जाव करा, शक्यतो त्याला घरातच बसवा किंवा फारच हट्ट धरला तर त्याच्याबरोबर बाहेर जात त्याला जवळच कुठेतरी फिरवून आणा, पण अन्य मुलांबरोबर त्याला गर्दीत सोडू नका, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे........*

संसर्ग होण्याची दाट शक्यताकोण खेळत आहे याची माहिती नसतेकोण आजारी आहे ते कळत नाहीखेळण्याचे साहित्य अनेकांकडून हाताळले जाते.दमल्यानंतर सहज प्रवृत्तीने घाम पुसला जातो.मैदानांवर विषाणू सहज शरीरात प्रवेश करू शकतात

.............................

* कसे थांबवता येईल मुलांना घरातच?त्यांच्याबरोबर वेगवेगळे बैठे खेळ खेळात्यांना गोष्टींची पुस्तके वाचायला द्यामुले फार लहान असल्यास त्यांना गोष्टी वाचवून दाखवाखाण्याचे पदार्थ त्यांच्या आवडीचे करात्यांना नात्यांची ओळख करून द्याफारच कंटाळली तर दोन-तीन ओळखीची मुले एकत्र करून त्यांना खेळू द्या; मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवा. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसStudentविद्यार्थी