CoronaVirus News : बारामतीकरांच्या चिंतेत वाढ! एकाच दिवशी 9 रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 10:11 IST2020-07-12T09:46:14+5:302020-07-12T10:11:47+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: बारामती नगर परिषद हद्दीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील सात व नवीन दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.

CoronaVirus News : बारामतीकरांच्या चिंतेत वाढ! एकाच दिवशी 9 रुग्णांची भर
बारामतीकरासाठी रविवारची सकाळ चिंता वाढवणारी ठरली आहे. पूर्वीच्या रुग्णाच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील 7 व नव्याने 2 असे कोरोनाचे 9 रुग्ण आढळून आले आहेत. बारामती नगर परिषद हद्दीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील सात व नवीन दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. नवीन व्यक्ती पैकी रुई येथील एक (पुरुष 25 वर्षे) व गुणवडी चौक परिसर मधील एक महिला (23वर्षे )आहे.
वसंत नगर येथील यापूर्वी एक रुग्ण पॉझिटिव्ह आला होता त्याच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मधील सहा रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यापैकी चार एकाच कुटुंबातील एक पुरुष (वय 31 वर्षे ) व 3 स्त्रिया (वय 44,27,04 वर्षे) आहेत. इतर एक पुरुष (वय 32 वर्षे) व एक स्री( 16 वर्षे ) त्याचप्रमाणे जेबीएम टाउनशिप मधील रुग्णाच्या कॉन्टॅक्ट मधील एक व्यक्ती (वय 35 वर्षे पुरुष) पॉझिटिव्ह आलेला आहे. बारामती नगर परिषद मधील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की या रुग्णाच्या संपर्कात असलेले असतील तर त्यांनी रुई हॉस्पिटलशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडावे. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्स पाळावे व वारंवार हात धुणे व सॅनिटायझरचा वापर करावा.या परिसरामध्ये आरोग्य कर्मचारी मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यांना योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
या देशाला आज मनमोहन सिंगांची गरज आहे, कारण...; शरद पवारांचं स्पष्ट मत
Bachchan Family Corona : जया बच्चन, ऐश्वर्या राय आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह
CoronaVirus News : कोरोनाचा धसका! पीपीई किट परिधान करून पानवाला चालवतोय टपरी
सोशल मीडियावर व्हायरल होणारा 140 नंबरबाबतचा 'तो' मेसेज म्हणजे अफवा
CoronaVirus News : कौतुकास्पद! ...अन् तिच्यासाठी डॉक्टर झाला गायक, Video पाहून तुम्हीही कराल सलाम
"...म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिन्यांत बाळासाहेबांची आठवण आली" - शरद पवार