शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : 'ऑक्सिजन'ची मागणी आली निम्म्यावर, पुरवठा वाढला; रुग्ण झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 22:02 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना काळात २५० मेट्रिक टनांपर्यंत मागणी वाढलेल्या ऑक्सिजनची मागणी आता निम्म्यावर आल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी सांगितले. 

पुणे - शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललेली असतानाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. एप्रिल महिन्यात ऑक्सिजनच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. परंतु, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या घटत गेल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वाढला आणि मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. कोरोना काळात २५० मेट्रिक टनांपर्यंत मागणी वाढलेल्या ऑक्सिजनची मागणी आता निम्म्यावर आल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी सांगितले. 

एप्रिल महिन्यात पालिकेला ४० टनांची मागणी होती. ही मागणी वाढून ५१ टनांवर पोचली होती. एकीकडे खाटा वाढविण्यात आल्या होत्या. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्याने दुसरीकडे चिंता वाढली होती. पालिकेची आठ कोविड रुग्णालये आहेत. नायडू रुग्णालयाला सात टन, दळवी रुग्णालयाला ९ टन, शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरला १६ टन,  बाणेर कोविड सेंटरला ११ टन, ईएसआयसी रुग्णालय बिबवेवाडीला ३ टन, खेडेकर रुग्णालयाला एक टन आणि लायगुडे रुग्णालयाला एक टन यासोबत अन्य आवश्यकता लक्षात घेता जवळपास ५० टन ऑक्सीजन लागत होता. तर खासगी रुग्णालयाला १५० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता. 

ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनीही ऑक्सिजन पुरवठ्यातील समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली होती. दरम्यान, पालिकेने आतापर्यंत तीन ऑक्सिजन प्लान्ट केले आहेत. तर, आणखी पाच प्लान्ट उभे केले जाणार आहेत.  पालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखाना, दळवी रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि बाणेर जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात प्लान्ट उभारण्यात आले आहेत. यातील, लायगुडे, दळवी आणि नायडूमधील प्लान्ट सुरू झाले आहेत. तर, बाणेर येथील प्लान्टचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर, खेडेकर, बाणेर, वारजे, नायडू आणि इंदिरानगर येथील रुग्णालयांमध्येही आणखी सहा प्रकल्प प्रस्तावित आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेOxygen Cylinderऑक्सिजन