Coronavirus : कोरोनामुळे पुण्यातील काही शाळांकडून परीक्षेत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 20:30 IST2020-03-10T20:28:45+5:302020-03-10T20:30:12+5:30

आजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा असली तरी शाळेत न येण्याचा दिला सल्ला

Coronavirus : changes from schools exams: The decision of private English schools | Coronavirus : कोरोनामुळे पुण्यातील काही शाळांकडून परीक्षेत बदल

Coronavirus : कोरोनामुळे पुण्यातील काही शाळांकडून परीक्षेत बदल

ठळक मुद्देइंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून कोरोनाबाबत काळजी; विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही शाळांनी आपल्या परीक्षा लवकर घेतल्या आहेत, तर काही शाळांनी आजारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा असली तरी शाळेत न येण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मास्क घालूनच शाळेत यावे, अशाही सूचना काही शाळांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून कोरोनाबाबत काळजी घेतली जात असल्याचे दिसून येत आहे.
विद्यार्थी व पालकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती केली जात असून, आजारी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये, अशा स्पष्ट सूचना इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. त्यातच कात्रज परिसरातील आर्यन शाळेने आपल्या परीक्षा काही दिवस लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच बिशप शाळेने शक्यतो विद्यार्थ्यांनी मास्क घालून शाळेत यावे, असा सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथील पवार पब्लिक स्कूलने आजारी असल्यास विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये, तसेच आजारी असणाºया विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतही काळजी करू नये, असे लेखी पत्र काढले आहे. तर ज्युनिअर केजी, सिनिअर केजी, नर्सरी व पहिलीच्या विद्यार्थ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत बुधवारपासून सुट्टी दिल्याचे पालकांना कळविले आहे.
--
प्रामुख्याने ज्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचे परदेशात जाणे-येणे असते, अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसह आवश्यक खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच आर्यन शाळेने आपल्या परीक्षा लवकर घेतल्या असून, बिशप शाळेने विद्यार्थ्यांना मास्क घालून शाळेत येण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे सर्व शाळांनी आपली स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन योग्य निर्णय घ्यावा, असे संघटनेतर्फे सर्व शाळांना कळविले आहे. 
- राजेंद्र सिंग, कार्याध्यक्ष, इंडिपेंन्डेट इंग्लिश स्कूल असोसिएशन
--
कोरोनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती केली असून, प्राथमिक व माध्यमिक वर्गाच्या परीक्षा काही दिवस अगोदर घेतल्या जात आहेत. परीक्षा संपल्यानंतरही शैक्षणिक वर्षाचा कालावधी संपेपर्यंत शाळा सुरूच ठेवली जाणार आहे. कोरोनामुळे कोणती परिस्थिती ओढवणार आहे; याबाबत सध्या कोणतीही कल्पना नसल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या परीक्षा १५ दिवस लवकर घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार काही वर्गाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.
- मिलिंद लडगे, संचालक, आर्यन स्कूल, कात्रज 

Web Title: Coronavirus : changes from schools exams: The decision of private English schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.