शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Baramati: : बारामतीत 'रेमिडीसिव्हर' च्या तुटवड्यामुळे रुग्णांचा जीव टांगणीला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 19:52 IST

लसीऐवजी रेमिडीसिव्हर उपलब्धतेवर; गांभीर्याने लक्ष देण्याची गरज 

बारामती : बारामती शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबरोबर रेमिडीसिव्हर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे शेकडो रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. इंजेक्शनचा तुटवडा गंभीर रुग्णांच्या जीवावर बेतण्याची भीती रुग्णाच्या नातेवाईकांना सतावत आहे. हे इंजेक्शन मिळविण्यासाठी बारामतीत रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या होत्या.मात्र, इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. इंजेक्शन वेळेत उपलब्ध न झाल्यास काही रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे लसीऐवजी रेमिडवीर च्या तुटवड्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये देखील यापूर्वी रेमिडीसिव्हरचा तुटवडा निर्माण झाला होता.यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट लक्ष घातल्याने या इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध झाला होता.सध्याच्या परीस्थितीत देखील तुटवडा निर्माण झाल्याने पुन्हा एकदा पवार यांनी लक्ष घालण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडुन होत आहे.

बारामतीत रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन उपलब्ध असणाऱ्या दुकानांचे नाव मोबाईल क्रमांकासह सोशल मीडियावर उपलब्ध झाले आहे.त्यानुसार शहरातील १६ दुकानांमध्ये हे इंजेक्शन विक्रीला ठेवण्यात आले आहे.मात्र,यापैकी एकाही मेडीकलमध्ये हे इंजेक्नशन मागणीच्या प्रमाणात उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.

शहरात रेमिडीसिव्हर इंजेक्शनचा कमालीचा तुटवडा जाणवत असून रुग्णांच्या नातेवाईकांना हे इंजेक्शन मिळविण्यासाठी रांगेत उभा रहावे लागत आहे.त्यानंतर देखील इंजेक्शन मिळेलच याची शाश्वती राहिलेली नाही. प्रशासन स्तरावर या इंजेक्शनबाबत कसलाच समन्वय नसल्याचा फटका नागरिकांना बसला आहे. 

.... 

जखम मांडीला उपचार शेंडीलाबारामती शहरातील एका बड्या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, सध्या कोरोनाबाबत ‘जखम मांडीला उपचार शेंडीला’ असा प्रकार सुरु आहे.बारामतीत ७० टक्क्यापेक्षा अधिक प्रमाणात फुफ्पुस निकामी झालेल्या रुग्णाला देखील रेमिडीसिव्हरचा इंजेक्शन वेळेत उपलब्ध होत नाही. सध्या केवळ गंभीर प्रकृती असणाऱ्या रुग्णांना रेमिडीसिव्हर  इंजेक्शन अत्यंत महत्वाचे आहे. वेळेत इंजेक्शन न दिल्यास  काही रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची भीती आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार