Coronavirus : ...म्हणून अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पुणे पोलिसांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:36 PM2020-04-19T14:36:20+5:302020-04-19T14:47:28+5:30

Coronavirus : अरुणाचल प्रदेशातून पुण्यात शिकण्यासाठी शेकडो विद्यार्थी नियमितपणे येत असतात.

Coronavirus Arunachal Pradesh CM Pema khandu say thanks to the Pune police SSS | Coronavirus : ...म्हणून अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पुणे पोलिसांचे आभार

Coronavirus : ...म्हणून अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पुणे पोलिसांचे आभार

googlenewsNext

पुणे - पुणे शहरात  राहणाऱ्या व लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या अरुणाचल प्रदेशातील ९० विद्यार्थ्यांसह ईशान्यकडील सुमारे १५० जणांना शहर पोलीस दलाच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अरुणाचल प्रदेशातील या विद्यार्थ्यांना वेळेवर मदत पुरविल्याबद्दल अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी पुणे पोलीस व सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आभार मानले आहेत.

अरुणाचल प्रदेशातून पुण्यात शिकण्यासाठी शेकडो विद्यार्थी नियमितपणे येत असतात. चीनमधून जगभरात कोरोना विषाणूचा फैलाव झाला. त्यामुळे चीनी लोकांसारखा तोंडवळा असलेल्या या अरुणाचल प्रदेशमधील या विद्यार्थ्यांना पुण्यात वावरताना खूप त्रास होऊ लागला आहे. त्यात लॉकडाऊनमुळे त्यांना जीवनावश्यक वस्तू मिळणे अवघड झाले आहे. त्यांच्याकडील साहित्य संपले असून पैशांचीही चणचण निर्माण झाली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आपले गाऱ्हाणे अरुणाचल प्रदेश राज्य शासनाला कळविले.

याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, चीनच्या दुतावासात अनेक वर्षे कार्यरत असलेले अधिकारी प्रशांत लोखंडे हे सध्या अरुणाचल प्रदेशात कार्यरत आहेत. त्यांचा पुण्यातील या विद्यार्थ्यांशी संपर्क होता. या विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी लोखंडे आणि राज्य शासनाला कळविल्या होत्या. लोखंडे यांच्याशी सुरुवातीपासून परिचय आहे. त्यांनी पुणे पोलिसांशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांची यादी पाठविली. त्यावरुन पुणे पोलिसांनी या विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. या विद्यार्थ्यांना बाहेर पडायला भिती वाटत होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या ग्रुपमध्ये बोलावून त्यांना जीवनावश्यक साहित्य पोहचविले आहे. या विद्यार्थ्यांकडून ईशान्यकडील काही राज्यांमधील आणखी काही विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे. अरुणाचल प्रदेशातील ९० व इतर राज्यातील विद्यार्थी अशा सुमारे १५० हून अधिक विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले आहे. यापुढेही त्यांच्याशी संपर्क कायम ठेवून त्यांना मदत करण्यात येणार असल्याचे डॉ. शिसवे यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : Apple Maps देणार आता कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती

Coronavirus : भयंकर! 'तो' वाद जीवावर बेतला, सॅनिटायझेशन करणाऱ्या तरुणाची हत्या

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत, रुग्णांचा आकडा 7,38,792 वर

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत

Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वर

Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन

 

Web Title: Coronavirus Arunachal Pradesh CM Pema khandu say thanks to the Pune police SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.