coronavirus : अन्न- धान्यापाून काेणी वंचित राहणार नाही याससाठी प्रशासन कटीबद्ध : जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 14:57 IST2020-04-03T14:55:22+5:302020-04-03T14:57:13+5:30
पुणे जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न- धान्यापासून वंचित राहणार नाही असे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिले.

coronavirus : अन्न- धान्यापाून काेणी वंचित राहणार नाही याससाठी प्रशासन कटीबद्ध : जिल्हाधिकारी
पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळण्यात काही अडचण येवू नये, यासाठी तसेच इतर सर्व तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष सुरु असून त्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनिल गाडे यांची स्वतंत्र समन्वयक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील एकही व्यक्ती अन्न-धान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहे. नागरिकांना काही अडचण असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
‘लॉकडाऊन’मुळे मावळ आणि मुळशी परिसरातील कुटुंबाला शासनाच्या धान्यवाटप योजनेचा मोठा आधार वाटत आहे. आमदार संग्राम थोपटे, उप विभागीय अधिकारी संदेश शिर्के व मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत बावधन ग्रामपंचायत पदाधिका-यांच्या सहकार्यातून येथील 200 कुटुंबांना पुढील पंधरा दिवसाचा शिधा व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वाटप करतांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे काटेकोर पालन करण्यात आले. वाटप करण्यात आलेले साहित्य साधारणपणे 15 दिवस इतके पुरेल. आवश्यकतेनुसार वाटप सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रशासन नागरिकांच्या अडीअडचणीसंदर्भात संवेदनशील असल्याचे कृतीतून जाणवते आहे.