शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

Corona virus : कामाचे दिवस चौदा नको, सात करा : ससून परिचारिकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 8:34 PM

ससूनमधील सहायक अधिसेविकेचा मृत्यू कामाच्या ताणामुळेच झाल्याचा आरोप...

ठळक मुद्दे ७६ परिचारिका, ७० डॉक्टर व ३१ वरिष्ठ डॉक्टर कोविड रुग्णालयातपुढील २८ दिवस त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली हॉटेलमध्ये सलग सहा तास पीपीई कीट घालून काम करणे कठीण

पुणे : ससून रुग्णालयातील परिचारिका व डॉक्टरांना सध्या सलग १४ दिवस कोविड रुग्णालयात काम करावे लागणार आहे. तसेच त्यानंतर पुढील १४ दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. परिणामी, शारीरिक व मानसिक ताण वाढू शकतो. त्यामुळे कामाचे दिवस सातच करावेत, अशी मागणी निवासी डॉक्टर व परिचारिकांकडून केली जात आहे. दरम्यान, ससूनमधील सहायक अधिसेविकेचा शुक्रवारी झालेला मृत्यू कामाच्या ताणामुळेच झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.रुग्णालयातील सहायक अधिसेविका अनिता राठोड यांचा शुक्रवारी उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. काही दिवसांपुर्वी राठोड यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण त्यातून त्या सावरू शकल्या नाहीत. त्या कोरोनाधित रुग्णांच्या वॉर्डमध्ये कार्यरत होत्या. त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नव्हता. त्यांच्या निधनानंतर शनिवारी सकाळी अनेक परिचारिकांनी रुग्णालय गाठत प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली. कामाचे तास कमी करण्यासह विविध अडचणी त्यांनी अधिष्ठाता मुरलीधर तांबे यांच्यासमोर मांडल्या. सध्या कोविड रुग्णालयात काम करणाºया परिचारिका, निवासी डॉक्टर व इतर कर्मचाºयांना दि. २० एप्रिल ते ३ मे असे सलग चौदा दिवसांचे काम देणयात आले आहेत. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ७६ परिचारिका, ७० डॉक्टर व ३१ वरिष्ठ डॉक्टर कोविड रुग्णालयात आहेत. पुढील २८ दिवस त्यांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.  ‘प्रत्येकाला सहा तासांचे काम देण्यात आले आहे. त्यानुसार चार सत्रांमध्ये काम चालते. पण सलग सहा तास पीपीई कीट घालून काम करणे कठीण जात आहे. या वेळेत काही खाता-पिता येत नाही. स्वच्छतागृहातही जाता येत नाही. पीपीई कीटमुळे खुप घाम येतो. त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची भिती वाटते. सलग चौदा दिवस अशाच पध्दतीने काम करत राहिल्यास इतर शारीरिक त्रास होऊ शकतात. त्याचप्रमाणे दि. ३ मे नंतर पुढील १४ दिवस त्याच हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यामुळे सलग महिनाभर कुटूंब, लहान मुलांपासून दुर राहावे लागेल. कामाच्या ताणाबरोबरच नंतर मानसिक ताणही येऊ शकतो. त्यामुळे कामाचे दिवस कमी करणे आवश्यक आहे. त्यानंतर चक्राकार पध्दतीने जेव्हा आम्हाला काम येईल, त्यानुसार सेवा करायला तयार आहोत, असे काही परिचारिका व डॉक्टरांनी सांगितले.--------राठोड यांचा मृत्यू कामाच्या अतिरिक्त ताणामुळेच झाला आहे. वरिष्ठांकडून सतत दबाव होता. परिचारिकांवरील कामाचा ताण कमी व्हावा म्हणून कामाचे दिवस १४ वरून सात दिवस करण्याची मागणी केली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यानुसार परिचारिकांंच्या कामाच्या दिवसांमध्ये बदल केला जाईल.- प्रज्ञा गायकवाड, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस