शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

Corona virus : 'लवासा ’तील हॉस्पिटल, हॉटेल ताब्यात घ्या, तिथे 'कोविड सेंटर' सुरू करा : गिरीश बापट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 5:57 PM

लवासा प्रकल्पातील रुग्णालये, हॉटेल ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

ठळक मुद्देखासदार गिरीश बापट व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन

पुणे : लवासामध्ये अद्ययावत असे रुग्णालय तयार आहे. त्याचप्रमाणे तिथे लोकवस्ती देखील कमी आहे. त्यामुळे लवासा हे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. तिथे कोविड रुग्णालय सुरू झाले तर मुळशी तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी थेट पुण्याला यावे लागणार नाही. प्रशासनाने मुळशी तालुक्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लवासामधील रुग्णालय व हॉटेलसह रिकाम्या इमारती ताब्यात घ्याव्यात आणि तिथे कोविड सेंटर सुरू करावे असे स्पष्ट मत पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. तसेच यासंबंधी आपण जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे देखील सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. तसेच  त्यांच्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत कोरोना निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याच धर्तीवर बापटांनी ही मागणी केली आहे. 

बापट म्हणाले, पुणे जिल्ह्यासह मुळशी तालुक्यात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या सर्व रुग्णांना कोरोनावरील उपचारासाठी थेट पुण्याला यावे लागते.त्यामुळे इतर  ठिकाणचे खासगी,शाळा, रुग्णालये ताब्यात घेण्यासाठी तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाने लवासामध्ये असलेले अद्ययावत रुग्णालय व हॉटेल व रिकाम्या इमारती देखील ताब्यात घ्याव्यात. या ठिकाणी असलेल्या अद्ययावत रुग्णालयामुळे वैद्यकीय यंत्रणेवर अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. तसेच डॉक्टर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यातर तात्काळ कोविड सेंटर उभे राहून तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक व गोर गरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल. यासंबंधी प्रशासनाला पत्र लिहून त्वरित पावले उचलत कार्यवाही करण्याची मागणी केली असल्याचे बापट यांनी सांगितले.

मुळशी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय असतानाही या परिसरातील लवासा प्रकल्पातील रुग्णालय, हॉटेल ताब्यात घेण्यात हयगय केली जात आहे. जिल्ह्यातील इतर खासगी रुग्णालयांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेणारे प्रशासन लवासाकडे का दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न मुळशीकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

............प्रशासनाची टोलवाटोलव‘‘तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहून अधिग्रहण करता येतील अशा रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली आहे. यात ‘लवासा’तील हॉस्पिटलचा समावेश आहे. सध्या मनुष्यबळाची मोठी कमतरता असून, कमी कर्मचाऱ्याांमध्ये जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन आहे. यामुळेच सध्याच्या मोठ्या सुविधा कार्यान्वित झाल्यावर ‘लवासा’तील हॉस्पिटलचा विचार करण्यात येईल,’’ असे मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसgirish bapatगिरीष बापटSharad Pawarशरद पवारNavalkishor Ramनवलकिशोर रामhospitalहॉस्पिटलhotelहॉटेल