शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

Corona virus : 'काय म्हणायचं यांना'; मास्क कुठे तर खिशात, अन् रस्त्यावर मात्र तोंड उघडे ठेऊन फिरतात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 5:08 PM

मास्क असूनही न घालता शहरात फिरणाऱ्या ७७८ जणांवर कारवाई  

ठळक मुद्देशहरात कोणतेही ठोस कारण नसतानाही पायी फिरणाऱ्यांची संख्याही मोठी विनाकारण वाहनांवरुन फिरणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई

पुणे : शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेक जण केवळ दाखविण्यापुरता मास्क स्वत: जवळ ठेवतात. प्रत्यक्ष तो तोंडाला न लावता फिरणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.गेल्या ५ दिवसात शहर पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या ७७८ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. हे केवळ पोलिसांना आढळून आलेले लोक आहेत.शहरात कोणतेही ठोस कारण नसतानाही पायी फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा ९०१ विनाकारण पायी फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत. याबरोबरच विनाकारण वाहनांवरुन फिरणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई केली असून २६२ वाहने ३ ते ७ जुलै दरम्यान जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय ट्रिपल सीट जाणाऱ्यांवर १०७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात यापुढे ही कारवाई आणखी तीव्र होणार आहे.लोकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कारण नसताना घराबाहेर फिरु नये़ स्वत:ची व इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी केले आहे.येरवडा पोलिसांनी येरवडा व कल्याणीनगर परिसरात मंगळवारी अचानक तपासणी सुरु केली. त्यात अनेक जण मास्क बरोबर असतानाही मास्क न लावता जाता येताना आढळून आले तर काही जणांकडे मास्कही नसल्याचे आढळून आले. अशा २४ जणांवर येरवडा पोलिसांनी कारवाई केली. ...........

गेल्या ४ दिवसात नियमभंग केल्याने वेगवेगळ्या कलमाखाली पुणे शहरात तब्बल एकूण २ हजार ४३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ आता पुणेकरांनी स्वत: वैयक्तिक रित्या शिस्तीचे पालन करण्याची वेळ आली आहे़ लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी सुरु राहिल़डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे़

..............................................................

३ ते ७ जुलै दरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई मास्क न घालता फिरणारे                                ७७८विनाकारण पायी फिरणारे                                ९०१विनाकारण वाहनांवरुन फिरणारे                      ३३६वाहने जप्त                                                     २६२मयार्देपेक्षा अधिक प्रवासी असणारी वाहने       १०७निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने              ४५फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणारी दुकाने         ३

......

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिसtwo wheelerटू व्हीलरcorona virusकोरोना वायरस बातम्या