Corona virus : वाघोलीत कोरोनाचे आणखी २ रुग्ण आढळले;परिसरात भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 04:27 PM2020-04-18T16:27:18+5:302020-04-18T17:48:47+5:30

वाघोलीतील ३० जणांनी खासगी लॅबमध्ये केली कोरोना टेस्ट

Corona virus : Two more corona suspected patient rise in Wagholi | Corona virus : वाघोलीत कोरोनाचे आणखी २ रुग्ण आढळले;परिसरात भीतीचे वातावरण

Corona virus : वाघोलीत कोरोनाचे आणखी २ रुग्ण आढळले;परिसरात भीतीचे वातावरण

Next
ठळक मुद्देवाघोली परिसरात घबराटीचे वातावरण

वाघोली : दोन दिवसापूर्वी वाघोली परिसरामध्ये खासगी लॅबच्या कोरोना रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णावर नायडू मध्ये उपचार सुरु असतानाच याच अनुषंगाने वाघोलीतील ३०  जणांनी खासगी लॅब मध्ये 'स्वॅब ' देऊन केलेल्या कोरोना चाचणीमध्ये दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी यांनी सांगितले. ४२ वर्षीय पुरुष व २४ वर्षीय तरुण या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे समजताच प्रशासनाची धावपळ सुरु झाली होती. दोघांनाही वाघोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून पुढील उपचारासाठी पुणे शहरामध्ये पाठविण्यात आले आहे. दोघांच्याही घराच्या परिसरामध्ये औषध फवारणी करण्याचे काम चालू होते. दोघांच्याही संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे काम वाघोली ग्रामपंचायत, लोणीकंद पोलीस व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून केले जात आहे.
********
पोलिस प्रशासकडून सर्वच परिसरावर करडी नजर ठेवण्यात येत आहे, परिसर सील करण्यात आला आहे. लोकांनी घाबरून न जाता घरातच थांबावे, कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरु नये, तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. - प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक

Web Title: Corona virus : Two more corona suspected patient rise in Wagholi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.