Corona virus : पुण्याचे मार्केट २५ ते ३१ मार्च बंद ठेवण्याचा व्यापारी वर्गाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 06:06 PM2020-03-23T18:06:29+5:302020-03-23T18:24:39+5:30

फळे, भाजीपाला विभागासह कांदा-बटाटा बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय

Corona virus : Treders decision to close Pune market from 25 to 31 March | Corona virus : पुण्याचे मार्केट २५ ते ३१ मार्च बंद ठेवण्याचा व्यापारी वर्गाचा निर्णय

Corona virus : पुण्याचे मार्केट २५ ते ३१ मार्च बंद ठेवण्याचा व्यापारी वर्गाचा निर्णय

googlenewsNext
ठळक मुद्देगूळ आणि भुसार बाजारदेखील ३१ मार्चपर्यंत बंद

पुणे : पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर, श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनची तातडीची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. २३) अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली घेतली. या सर्वसाधारण सभेत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येत्या २५ मार्च ते ३१ मार्चदरम्यान फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा बाजार संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. 
याबाबत अडत्यांच्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या बैठकीत येत्या मंगळवारी (दि. २४) गुलटेकडी मार्केट यार्डातीलफळे, भाजीपाला व कांदा-बटाटा बाजार संपूर्णपणे चालू ठेवणार आहे; परंतु त्यानंतर २५ ते ३१ मार्चदरम्यान सात दिवस मार्केट यार्डातील सर्व विभाग म्हणजे फळे, भाजीपाला विभागासह कांदा-बटाटा बाजार पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय अडते असोसिएशनच्या वतीने घेतला आहे. यामुळे सर्व शेतकरी, अडते, व्यापारी, कामगार व टेम्पोचालक या सर्व बाजार घटकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी केले आहे. 
०००
गूळ आणि भुसार बाजारदेखील ३१ मार्चपर्यंत बंद
मार्केट यार्डातील फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा विभागासोबतच आता संपूर्ण गूळ आणि भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय दि पूना मर्चंट चेंबरच्या वतीने घेतला आहे. यापूर्वी मार्केट यार्डामध्ये भाजीपाला विभाग बंद ठेवला होता; पण भुसार बाजार चालू होता. परंतु, आता गूळ आणि भुसार बाजारदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. 

Web Title: Corona virus : Treders decision to close Pune market from 25 to 31 March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.