शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

Corona Virus Pune: उच्च न्यायालयाकडूनच पुणे महापालिकेच्या बेड मॅनेजमेंटची 'पोलखोल' ; कोरोना कंट्रोल रूमचा प्रताप  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:05 PM

ऑक्सिजन बेड शिल्लक असतानाही शिल्लक नसल्याचे दिले उत्तर....

पुणे : पालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी नियंत्रण कक्ष सूर करण्यात आलेला आहे. मात्र, या कक्षात फोन केला तर बेड शिल्लक नसल्याचे सांगितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची शहानिशा थेट उच्च न्यायालयाकडूनच करण्यात आली. न्यायालयातून पालकेच्या नियंत्रण कक्षात फोन करून बेडबाबत विचारणा करण्यात आली. पालिकेच्या डॅशबॉर्डवर एका खासगी रुग्णालयातील पाच बेड शिल्लक दिसत असतानाही नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्याने बेड शिल्लक नसल्याचे सांगितले. त्यामुळे नियंत्रण कक्षाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

कोरोना रुग्णांना आवश्यक आरोग्य सुविधा दिल्या जात नसल्याची तक्रार करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्यावर बुधवारी सुनावणी होती. मागील आठवड्यात झालेल्या सुनावणीवेळी रुग्णसंख्या वाढत असल्याची दखल घेत पुण्यात लॉकडाऊन का करण्यात येऊ नये असा सवाल न्यायालयाने केला होता.

राज्य शासनाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात जिल्ह्याची आकडेवारी सादर केल्याने न्यायालयाची दिशाभूल झाल्याचा आरोप सत्ताधारी भाजपाने केला होता. पालिकेने बुधवारी न्यायालयात रुग्णसंख्या, उपाययोजना याबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. ही सुनावणी सुरू असताना न्यायालयाने पालिकेच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. ऑक्सिजन बेड बाबत विचारणा केली. फोन घेतलेल्या कक्षातील शिक्षिकेने ऑक्सीजन बेड शिल्लक नसल्याचे सांगितले. मात्र, त्यावेळी शहरातील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये ५ ऑक्सीजन बेड शिल्लक असल्याचे दिसत होते. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल म्हणाल्या या प्रकाराची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे.............नियंत्रण कक्षाचे काम खासगी कंपनीला देण्यात आलेले आहे. कक्षातील कामासाठी पालिकेच्या शिक्षकांची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे हा गोंधळ झाल्याचे दिसत असून यापुढे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच ही जबाबदारी देण्यात येणार आहे.----शहरातील बेडची संख्या, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, पालिकेच्या रुग्णालयांतील सुविधा आदी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या उपाययोजनांबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले. डॅशबोर्ड आणि नियंत्रण कक्षातील निर्दोष कामासाठी  कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.- ऍड. मंजुषा इधाटे, मुख्य विधी सल्लागार, पुणे महापालिका.      

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल