शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
5
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
6
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
7
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
8
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
9
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
10
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
11
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
12
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
13
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
14
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
15
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
16
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
17
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
18
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
19
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
20
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल

Corona virus : पुण्यात मुंबई, ठाण्यापेक्षा कमीच रुग्ण; सरकारी यंत्रणांमध्येच समन्वय नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 10:56 IST

राज्य , केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे चुकीची माहिती

ठळक मुद्देकाही दिवसांपासून पुणे जिल्ह्याबाबत दिली जातेय चुकीची माहिती

पुणे : पुण्यातील उपचाराधिन कोरोनाबाधितांची संख्या मुंबई, ठाण्यापेक्षा कमी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारकडूनच चुकीची माहिती प्रसारित केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे राज्यातील सर्वात मोठे कोरोना हॉटस्पॉट बनल्याची चुकीची चर्चाही त्यामुळे सुरू झाली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्य नियंत्रण कक्षातर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कोरोनाबाबतची माहिती दिली जाते. राज्य सरकारही हीच माहिती अधिकृत मानते. मात्र, काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याबाबत चुकीची माहिती दिली जात आहे. मंगळवारी तर पुणे जिल्ह्यातील उपचाराधिन (अ‍ॅक्टीव्ह) रुग्णांची संख्या ३६,८१० इतकी दाखविली होती. ठाणे आणि मुंबईपेक्षा हा आकडा जास्त असल्याने पुण्यात राज्यात सर्वाधिक रुग्ण असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, प्रत्यक्षात पुण्यामध्ये १९ हजारांच्याच आसपास रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे केंद्र सरकारकडेही पुण्याबाबत हिच चुकीची माहिती गेली आहे. 

कोविड पोर्टलच्या अ‍ॅपमध्ये प्रत्येक फॅसीलिटी सेंटरने ही माहिती भरणे अपेक्षित आहे. परंतु, पुणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातून ही माहिती व्यवस्थित भरली गेली नसल्याचे दिसत असल्याचे आरोग्य विभागातील अधिकाºयांनी सांगितले. मंगळवारी रात्रीपर्यंत पुणे शहरात १५,४३४, पिंपरी-चिंचवड शहरात ३,७७६ तर ग्रामीण भागात २२३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा दररोजचा कोरोना रुग्णांचा अहवाल कोविड इंडिया या केंद्र सरकारच्या पोर्टलवरील माहितीनुसार तयार केला जातो. त्यावरील माहिती जिल्हा आरोग्य विभागातून भरली जाते. पुण्याची आकडेवारी अद्ययावत केलेली दिसत नाही. याबाबत दोन दिवसांपूर्वी सांगण्यात आले आहे. - डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, महाराष्ट्र

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामAjit Pawarअजित पवारState Governmentराज्य सरकार