Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३८० नवे कोरोनाबाधित तर ६४१ रुग्ण झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 21:00 IST2021-06-05T21:00:17+5:302021-06-05T21:00:28+5:30
१३४७ रुग्ण ऑक्सिजनवर : ७०९ अत्यवस्थ, १८ मृत्यू

Corona virus Pune : पुणे शहरात शनिवारी ३८० नवे कोरोनाबाधित तर ६४१ रुग्ण झाले बरे
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट सुरू असून शनिवारी दिवसभरात ३८० रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात ६४१ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील ७०९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा ४ हजार ५६३ झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, १ हजार ३४७ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात १८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ३७९ झाली आहे. पुण्याबाहेरील १० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण ६४१ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५९ हजार १५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७१ हजार ९५७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४ हजार ५६३ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ३०९ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २५ लाख ३३ हजार १३० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.